रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सारामुळे सैफीनानं मोडलं किस न करण्याचे वचन

2012 साली करीना कपूर आणि सैफ अली खान विवाह बंधनात अडकले आणि यानंतर त्यांनी सिनेमामध्ये कोस्टारसोबत किस न करण्याचे ठरवले. परंतू मागील वर्षी दोघांनी आपले वचन मोडित काढले.
करीनाने 'की अँड का' मध्ये तर सैफने 'रंगून' या सिनेमात किसिंग सीन दिले. आता यानंतर नेमके असे काय घडले की दोघांनी आपले वचन मोडले तर याचे उत्तर स्वत: करीनाने दिले. ती म्हणाली हा निर्णय घेण्यामागे सैफची मुलगी सारा अली खान हिचा हात आहे.
 
करीनाने सांगितले की साराने आम्हाला म्हटले की ऑनसक्रीन को-स्टारसोबत किस करायला काहीच हरकत नसावी, कारण हे इतर सींसप्रमाणे सिनेमाची गरज असू शकते. म्हणून आपल्या बाबा आणि नवीन आईला किसिंग सीन देण्याचा सल्ला मुलीने दिला आणि दोघांना तो पटला.