शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

अमीर काम करणार नागराज सोबत

मराठीत इतिहास केलेला आणि सर्वाधिक कमाई असलेला सैराट प्रसिद्ध आहे.याची भुरळ आमीर खानला सुद्धा पडली आहे.त्यामुळे आमीर खान आता दिग्दर्शक-अभिनेता नागराज मंजुळेसोबत काम करणार असल्याची चर्चा सध्या इंडस्ट्रीमध्ये सुरू झाली आहे.  नव्या प्रोजेक्टसाठी हे दोघं एकत्र येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आमीरने स 'फँड्री' आणि 'सैराट' हे नागराज मंजुळेचे सिनेमे आवडल्याचे सांगत त्याच्या कामाचे कौतुक केले होते. त्यामुळे आता अजय अतुल नंतर नागराज हा मराठी चेहरा बॉलीवूड मध्ये आपला ठसा उमटवणार आहे.