शनिवार, 17 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 जानेवारी 2017 (15:52 IST)

अभिनेते-निर्माते नीरज वोरा कोमामध्ये

neeraj vora
गेल्या दोन महिन्यांपासून बॉलिवूडचे अभिनेते-निर्माते नीरज वोरा कोमामध्ये आहेत. दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ऑक्टोबर 2016 मध्ये दिल्लीत असताना नीरज यांना ब्रेन स्ट्रोक आला. तेव्हापासून त्यांच्यावर एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्या तब्येतीत सुधारणा होत असली तरी अजूनही त्यांच्या प्रकृतीला धोका कायम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. वोरा यांनी 'रंगीला', 'अकेल हम अकेले तुम', 'चोरी चोरी चुपके चुपके' आणि 'हेरा फेरी' या सुपरहिट सिनेमांच्या पटकथा लिहिल्या आहेत. दरम्यान, नीरज वोरा यांच्या पत्नीचे निधन झाले असून त्यांना मुलबाळ नाही. मुंबईमधीलच मित्र सध्या त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत आहेत.