Festival Posters

काली मां पोस्टरवरून महुआ मोईत्रा यांच्या वक्तव्याने नवा वाद

Updated: बुधवार, 6 जुलै 2022 (15:29 IST)
 
एका टीव्ही चॅनलशी बोलताना त्या म्हणाल्या, "काली देवीचे अनेक रुपं आहेत. माझ्यासाठी काली देवी मांसाहार करणारी आणि दारूचा स्वीकार करणारी आहे. जर तुम्ही तारापीठात गेलात आणि तिथे आजूबाजूला पहाल तर तुम्हाला साधू लोक सिगारेट ओढताना दिसतील. मला वाटतं हिंदू धर्मात राहताना, काली मातेची पूजा करणारी मी हव्या त्या स्वीकार करण्याची मुभा मला मिळावी. हे माझं स्वतंत्र्य आहे आणि त्यामुळे कोणाच्या भावना दुखावतील असं मला वाटत नाही."
 
तुम्ही तुमच्या देवाला कशा पद्धतीने पाहता यावर सगळं अवलंबून आहे असं त्यांचं मत आहे. उदा. तुम्ही भूतानला जाता, सिक्कीमला जाता आणि तिथे लोक सकाळी पूजा करतात आणि देवाला दारूचा नैवेद्य दाखवतात. उत्तर प्रदेशात काही ठिकाणी याबद्दल सांगितलं तर तुम्ही ईशनिंदा केल्याचा आरोप तुमच्यावर लागतो. असंही त्या पुढे म्हणाल्या.
 
भाजपने त्यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे. मौईत्रा यांच्या टीएमसी पक्षानेसुद्धा त्यांच्या या वक्तव्यावरून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र टीएमसी असं करू शकत नाही असं भाजपचं मत आहे.
 
पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष म्हणाले, "जर टीएमसी या वक्तव्याचं समर्थन करत नसेल तर त्यांनी मोईत्रा यांच्यावर कारवाई करावी. त्यांनी मोईत्रा यांची हकालपट्टी करायला हवी किंवा निलंबित करायला हवं."
 
भाजपाचा महिला मोर्चा त्यांच्या या वक्तव्यांच्या विरोधात निदर्शनं करतील असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सर्व पहा

72nd National Film Awards: 'आर्टिकल ३७०' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा, तर कार्तिक आर्यन आणि ममूटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला

कार्तिक आर्यनला त्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला; कुटुंबासोबत विजयाचा आनंद साजरा केला

रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर लीक, यशचा रावणाचा अवतारही दिसला

जान्हवी कपूरला एक नवीन चित्रपट मिळाला, या दिग्दर्शकासोबत काम करणार

सनी देओलच्या 'पार्टिशन १९४७' चा टीझर प्रदर्शित; फाळणीची हृदयद्रावक कथा अंगावर काटा आणेल

सर्व पहा

पंजाबचे मुख्यमंत्री राजीनामा कधी देणार? श्वेता तिवारी यांनी 'झुरळ जनता पक्षा'वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

महादेव मंदिरातील हे शिवलिंग दर १२ वर्षांनी तुटते; त्याचे तुकडे कसे जोडले जातात ते जाणून घ्या

'स्पायडर मॅन' आणि मोठ्या हिंदी चित्रपटांमध्ये अडकला राजकुमार रावचा चित्रपट, निर्मात्यांनी 'प्रहार' पुढे ढकलला

मनोज मुंतशीर यांनी 'आदिपुरुष'बद्दल म्हटले, चित्रपटाचा बचाव करणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती

इंदूरमधील ऐतिहासिक पंढरीनाथ मंदिर आणि आषाढी एकादशीची परंपरा

पुढील लेख
Show comments