1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

Panchayat 3 Trailer relese : पंचायत 3 चा धमाकेदार ट्रेलर आला

ॲमेझॉन प्राइम व्हिडिओची सर्वात लोकप्रिय वेब सीरिज पंचायत सीझन 3 लवकरच रिलीज होणार.ही TVF ची आत्तापर्यंतची सर्वात यशस्वी वेब सिरीज आहे. या मध्ये अभिषेक त्रिपाठीची भूमिका जितेंद्र कुमार यांनी साकारली आहे. पहिल्या दोन सिझन मध्ये तो फुलोरा नावाच्या गावात सचिव म्हणून काम करतो. पहिल्या दोन सिझन ला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. या मध्ये ग्रामीण भारतासाठी महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. आता निर्मात्यांनी पंचायत 3 चा ट्रेलर रिलीज केला आहे. ट्रेलर 17 मे रोजी रिलीज होणार होता. परंतु निर्मात्यांनी दोन दिवस आधीच ट्रेलर रिलीज केला आहे. 
 
 ट्रेलरमध्ये, जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय आणि सानविका ही स्टार कास्ट हृदय आणि राजकारणात अडकलेली दिसत आहे.
दोन मिनिटांपेक्षा जास्त लांबीच्या ट्रेलरची सुरुवात एका नवीन 'सेक्रेटरी'ने होते, जो रघुबीर यादवने साकारलेला गावप्रमुखाचा परिचय करून देतो. प्रेक्षकांना ही सीरिज 28  मे पासून प्राईम व्हिडिओवर पाहायला मिळणार आहे. 

Edited by - Priya Dixit