Marathi Biodata Maker

'होशियार चंद'च्या भूमिकेत परेश रावल?

गुरूवार, 4 जुलै 2019 (16:23 IST)
गोविंदा आणि करिश्मा कपूर यांचा 1995मधील सुपरहिट चित्रपट 'कुली नंबर 1' चित्रपटाच्या रिमेकची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. डायरेक्टर डेविड धवनच्या या चित्रपटात मुख्यभूमिकेत वरुण धवन आणि सारा अली-खान झळकणार आहे. याशिवाय मूळ चित्रपटात कादर खानने साकारलेली होशियार चंदची भूमिका अनुपम खेर साकारणार असल्याची चर्चा होती. पण या चित्रपटात मी काम करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आता या भूमिकेसाठी परेश रावल यांना कास्ट करण्यात आले आहे. 'कुली नंबर 1'मध्ये सारा अली-खानच्या वडिलांची भूमिका ते साकारणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग ऑगस्ट महिन्यात थायलंडची राजधानी बँकॉक येथे सुरु करण्यात येणार आहे. हे चित्रीकरण सुमारे 20 दिवस चालणार आहे. या ठिकाणी सारा, वरुण आणि परेश रावल यांचे सीन शूट करण्यात येणार आहेत. दरम्यान, चित्रपटात परेश रावलची दुसरी मुलगी आणि साराच्या बहिणीच्या भूमिकेसाठी दिशा पाटणीचे नाव आघाडीवर आहे. पण अद्याप त्याला दुजोरा मिळालेला नाही. हा चित्रपट पुढील वर्षी 1 मे रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सर्व पहा

करण जोहरने इन्स्टाग्रामवर शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना अनफॉलो केले

"द पिरॅमिड स्कीम" ट्रेलर प्रदर्शित: झटपट श्रीमंत होण्याच्या लोभाची एक धोकादायक कहाणी

मास्टरशेफ इंडियाचा विजेता पंकज भदौरियाला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान

बॉबी देओलने यशराज फिल्म्सच्या अल्फा या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव सांगितला

मनोज बाजपेयी यांच्या आगामी 'गव्हर्नर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला

सर्व पहा

भूल भुलैया'मधील तरुण पंडिताचा लूक कसा साकारण्यात आला? राजपाल यादव यांनी सांगितले

Eight mysterious and haunted forts in India जिथे पर्यटक दिवसासुद्धा भेट देण्यास घाबरतात

'धुरंधर'चे प्रोडक्शन डिझायनर सैनी एस. जोहरे, लैंगिक छळ प्रकरणात अडकले, POSH समितीकडून दोषी आढळले

इम्रान हाश्मी अशोक खरातची भूमिका साकारणार? नाशिकच्या भोंदू बाबावर बनत असलेल्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार अशी चर्चा

बायपोलर डिसऑर्डरच्या औषधांमुळे सर्व केस गळून पडले, हनी सिंग म्हणाला, "मी विग घालतो"

पुढील लेख
Show comments