Festival Posters
✕

Pushpa 2: प्रतीक्षा संपली! पुष्पा 2 च्या रिलीजची तारीख जाहीर, या दिवशी येणार!

Updated: सोमवार, 11 सप्टेंबर 2023 (19:26 IST)
 
अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'पुष्पा 2: द रुल' 15 ऑगस्ट 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट 2021 मध्ये आलेल्या 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटातूनच अल्लू अर्जुनला 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्या'चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सुपरहिट चित्रपटाचे प्रोडक्शन हाऊस असलेल्यामाइथ्री मूवी मेकर्स ने सोशल मीडियावर चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर केली. या घोषणेनंतर चाहते चांगलेच उत्सूक झाले आहेत.
 
'पुष्पा 2' मधील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक पोस्ट या वर्षाच्या सुरुवातीला शेअर करण्यात आला होता. यामध्ये तो साडी नेसलेला दिसत होता. अभिनेत्याच्या चेहऱ्यावरील मेकअप लाल आणि निळ्या रंगाने दिसत होता. तो बांगड्या, दागिने, कानातले आणि नाक पिन घातलेला दिसला. या चित्रपटातील रश्मिका मंदान्नाचा लूकही लवकरच शेअर केला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, निर्मात्यांनी रश्मिकाच्या लूकआधीच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. यासोबतच सिंघम अगेन हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत दोन्ही चित्रपटांमध्ये टक्कर होऊ शकते.
 
सुकुमार दिग्दर्शित चित्रपटात फहद फासिल पुन्हा एसपी भंवर सिंग शेखावतची भूमिका साकारणार आहे. दरम्यान, रश्मिका मंदान्ना श्रीवल्लीच्या भूमिकेत परतण्यासाठी सज्ज झाली आहे. 
 





Edited by - Priya Dixit   
 
 

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

जॅकी श्रॉफ आणि शरद केळकर यांच्या भयपट 'काली खेती'ने कृष्णधवल ट्रेलरद्वारे नवीन वातावरण निर्माण केले

आलिया भट्ट, आर्यन खान ते वैभव सूर्यवंशी, TIME100 नेक्स्ट इंडियाची पहिली यादी जाहीर झाली

सचिन सराफ यांचा दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण; अमित साध प्रमुख भूमिकेत झळकणार ‘प्रताप’ या अ‍ॅक्शन ड्रामामधून

अभिनेता सैफ अली खानला जीवे मारण्याची धमकी; बाबा सिद्दीकीच्या मारेकऱ्याचे नाव समोर आले

Ye Prem Mol Liya Trailer 'ये प्रेम मोल लिया'चा ट्रेलर प्रदर्शित: आयुष्मान आणि शर्वरीने जिंकली मने; लग्नानंतर येणार एक मोठा वळण!

पुढील लेख
Show comments