शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

येणार्‍या पाहुण्याच नाव सैफीना नाही: सैफ

सैफ अली खान आणि करीना कपूर खान लवकरच आई-वडील होणार असून आधीही बातमी होती की ते आपल्या अपत्याचे नाव सैफीना ठेवणार आहे. परंतू सैफने स्पष्ट केले की त्यांनी अजून नाव ठरवलेले नाही. त्यांना हेच माहीत नाही की मुलगा होणार वा मुलगी तर नाव ठरवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

सैफने हेही म्हटले की सैफीना हे नाव तर मुळीच ठेवणार नाही. करीना डिसेंबर महिन्यात आई होणार असून हे तिचं पहिलं बाळ असेल. सैफला आपल्या पहिल्या बायकोकडून एक मुलगा व एक मुलगी आहेत. सध्या सैफ आणि करीना येणार्‍या नव्या पाहुण्याची आतुरतेने वाट बघत आहे.