Marathi Biodata Maker
✕

Salman Khan Hugs Aishwarya सलमान खानने ऐश्वर्या रायला मिठी मारली? या फोटोचे सत्य काय आहे?

Updated: बुधवार, 8 नोव्हेंबर 2023 (12:48 IST)
 
सलमान आणि ऐश्वर्याने केले एकमेकांना हग?
आता एक असा फोटो समोर येत आहे ज्यामुळे सोशल मीडियावर धमाल होत आहे. पुन्हा एकदा लोक ऐश्वर्या आणि सलमान खानची नावे एकत्र घेताना दिसत आहेत. कारण आता वर्षांनंतर त्यांचे एकत्र असल्याचे चित्र समोर आले आहे. हा फोटो कोणत्याही सामान्य पोजचा नसून या फोटोमध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल पण आता हे चित्रही तसाच दावा करत आहे. हा व्हायरल झालेला फोटो तुम्हीच पहा.
 
काय आहे प्रकरण?
हा फोटो मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीचा असल्याचं सांगितले जात आहे. यात सलमान खान एका मुलीला हग करताना दिसत आहे. तथापि दोघांचा चेहरा स्पष्ट दिसत नाहीये पण चाहत्यांचा दावा आहे की हे दोघे अजून कुणी नाही तर सलमान आणि ऐश्वर्या आहे. याचे कारण म्हणजे सलमानने ज्या मुलीला मिठी मारली आहे त्या फोटोत दिसलेल्या मुलीचे कपडे अगदी ऐश्वर्याने घातलेल्या कपड्यांसारखेच आहेत. यामुळे चाहत्यांना वाटू लागले की कदाचित या दोघांचे आता पॅचअप झाले.
 
ऐश नाही तर कोण आहे ही मुलगी?
पण प्रकरण वेगळे आहे. एक सारख्या कपड्यांमुळे निर्माण झालेला हा गैरसमज आहे. आता आपण हे देखील जाणून घेऊया की सलमानने नेमकी कोणाची हग केले आहे. ही मिस्ट्री गर्ल दुसरी कोणी नसून सना पांचोली आहे. जर तुम्ही तिला ओळखले नसेल तर माहितीसाठी सना ही प्रसिद्ध अभिनेता सूरज पांचोलीची बहीण आणि आदित्य पांचोलीची मुलगी आहे. सलमानचे पांचोली कुटुंबाशी चांगले संबंध आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. सलमानने अनेकदा सूरजला सपोर्ट केला आहे.

सर्व पहा

"आमच्याकडे ७०,००० शूटर, २०० 'भाऊ' मुंबईत" सलमान खानशी जवळीक पडणार महाग

प्रभासच्या 'स्पिरिट'च्या प्रदर्शनाची नवीन तारीख अधिकृतपणे जाहीर

अजय देवगणला मोठा धक्का! 'दृश्यम ३'च्या यशानंतर बीएमसीकडून जुहूतील बंगल्याचा अनधिकृत भाग पाडण्यात आला

सलमान खान आपल्या नवीन यूट्यूब चॅनलद्वारे मनोरंजक पद्धतीने मौल्यवान धडे देऊन नव्या पिढीला प्रेरणा देणार

अथर्व सुदामेच्या 'कांदेपोहे' कार्यक्रमावरून वाद; अभिनेता कुशल बद्रिकेचा जाहीर संताप

सर्व पहा

प्रभासच्या आगामी 'फौजी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला, प्रभास एका वेगळ्या अवतारात दिसणार

रामायण'मधील 'मंगल रंग' हे गाणे प्रदर्शित झाले

टायगर श्रॉफने मुंबईतील आपला आलिशान फ्लॅट ९ कोटी रुपयांना विकला

टायगर श्रॉफवर हल्ला करण्याचा कट इंदूरशी संबंधित, एका आरोपीला ताब्यात घेतले

भारतातील या प्रमुख ठिकाणी अतिशय उत्साहात साजरी होते कोजागिरी पूर्णिमा

पुढील लेख
Show comments