बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 जानेवारी 2025 (18:27 IST)

विवाहबंधनात अडकले गायक अरमान मलिक, लॉन्ग टाइम गर्लफ्रेंड आशना श्रॉफ सोबत घेतले सप्तपदी

Bollywood News: बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरमान मलिक लॉन्ग टाइम गर्लफ्रेंडआशना श्रॉफसोबत विवाहबंधनात अडकले आहे. अरमानने 2023 मध्ये त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठ्या असलेल्या आशनाशी साखरपुडा केला होता. तसेच अरमान मलिकने त्याच्या लग्नाचे अनेक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
 
तसेच अरमान आणि आशना यांच्या आयुष्यातील नवीन प्रवासाची सुरुवात केल्याबद्दल चाहते आणि सेलिब्रिटीज त्यांचे अभिनंदन करत आहे. अरमान मलिक आणि आशना श्रॉफ खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. 2017 मध्ये दोघांची भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण, काही अडचणींमुळे दोघेही वेगळे झाले. यानंतर, 2019 मध्ये अरमान आणि आशना पुन्हा एकदा भेटले आणि तेव्हापासून ते एकत्र आहे. आशना पती अरमानपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. तसेच आशना व्यवसायाने YouTuber, ब्लॉगर, सोशल मीडिया सेलिब्रिटी म्हणून ओळखली जाते. ती फॅशन आणि सौंदर्याशी संबंधित ब्लॉग तयार करते.

Edited By- Dhanashri Naik