Marathi Biodata Maker

तापसीने घेतला चांगला निर्णय

बुधवार, 28 जून 2017 (15:18 IST)
तापसी पन्नू जेंव्हापासून हिरोईन म्हणून ओळखली जायला लागली, तेंव्हापासून तिच्याकडून अपेक्षाही खूप वाढायला लागल्या. जाहिराती आणि इव्हेंटसाठीही तिच्याकडे बऱ्याच ऑफर यायला लागल्या आहेत. मध्यंतरी तिला अशाच एका इव्हेंटसाठी उपस्थितीचे निमंत्रण आले होते. पण तिने चक्क हा इव्हेंट नाकारला. पैसे बऱ्यापैकी मिलणार होते. पण तापसीने नक्की कोणत्या कारणासाठी हा इव्हेंट नाकारला हे समजले, तर तिच्याबद्दल आदरच वाटायला लागेल. या इव्हेंटच्या उपस्थितीबाबत जे मानधन मिळणार होते, ते रोख स्वरुपात मिळणार होते. तशी अटच या इव्हेंटच्या आयोजकांनी तापसीला घातली होती. पण रोख पैसे स्वीकारणे हे भारत सरकारच्या “डिजीटलायजेशन’च्या धोरणाच्या विसंगत असल्याने तापसीने या इव्हेंटला उपस्थित राहण्याचेच नाकारले. भोपाळमधील ज्या कार्यक्रमासाठी ती जाणार होती त्याची जाहिरात केली गेली होती. पण जेंव्हा तिला आपले मानधन रोख मिळणार असल्याचे समजले तेंव्हा चेक किंवा कॅश ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे देण्याची विनंती तिने केली. मात्र याला आयोजकांची तयारी नव्हती. म्हणून इव्हेंटच्या दोन दिवस आगोदर तिने आपला नकार कळवला. काळा पैसा रोखण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. तेंव्हा एवढे तरी आपण निश्‍चितपणे करू शकतो, असे ती म्हणते. रोखीच्या व्यवहारांना टाळण्यासाठी तिने नेहमीच “डिजीटल” पर्याय स्वीकारले आहेत. तापसीला कष्टाने आणि प्रामाणिकपणे कमावलेला पैसा हवा आहे. त्यासाठी अधिक चांगली कामे करण्याची तिची तयारी आहे. 

सर्व पहा

सलमान खानने निसर्गाच्या सानिध्यात निवांत क्षणांचा आनंद घेतला; फोटो व्हायरल

"मी माझे एग्स फ्रीझ केले..." 'मिमी'च्या शूटदरम्यान क्रिती सेनॉनने घेतला मोठा निर्णय

सुनीता आहुजाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, मुलगा यशवर्धनसोबत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीतील अडचणींबद्दल सांगितले

लॉकअप २' मधून बाहेर पडली गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा

सर्व पहा

गदर २' नंतर सनी देओल पुन्हा एकदा लाहोरमध्ये धुमाकूळ घालणार

...तर याला लव्ह जिहादचे उदाहरण मानायचे का? आमिर खानच्या लग्नावरून नितेश राणेंचा सवाल

ज्युरॅसिक पार्क' फेम अभिनेते सॅम नील यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते पवन कल्याण यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया

मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री मेधा मांजरेकर यांना कॅन्सरचे निदान

पुढील लेख
Show comments