1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 23 मार्च 2024 (09:23 IST)

‘पुष्पा २’ मधील श्रीवल्लीची पहिली झलक झाली व्हायरल

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा २’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाशी संबंधित कोणतीही बातमी व्हायरल होताच चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढताना दिसते. अशा परिस्थितीत आता चित्रपटाच्या शूटिंगशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, या व्हिडिओत चाहत्यांना श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदानाची झलक पाहायला मिळाली आहे. रश्मिका मंदानाची झलक पाहिल्यानंतर चाहते उत्साहित झाले आहेत.
 
‘पुष्पा २’ मध्ये कलाकारांचा लूक, शूटिंग आणि इतर सर्व गोष्टी सुरुवातीपासून लपवून ठेवल्या जात आहेत, दरम्यान, या चित्रपटाच्या शूटिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये रश्मिका मंदाना लाल रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. लाल रंगाची साडी, केसात गजरा आणि दागिने परिधान करून रश्मिका मंदाना खूपच सुंदर दिसत आहे.शूटिंग आजूबाजूला बरेच चाहते जमले आहेत, ते रश्मिका मंदान्नाची एक झलक पाहण्यासाठी आतुर झालेले दिसत आहेत. रश्मिकाच्या फॅन क्लबने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना हा श्रीवल्लीचा फर्स्ट लूक आहे, असे कॅप्शन लिहिले आहे.

Edited By -Ratnadeep Ranshoor