Dharma Sangrah
✕

सध्याचा हा ट्रेलर हा पहिला आणि शेवटचा इशारा आहे :अनमोल बिश्नोई

Updated: सोमवार, 15 एप्रिल 2024 (09:24 IST)

तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे. लॉरेन्स बिश्नोईचा यूएसस्थित भाऊ अनमोल बिश्नोई याने सलमान खानसाठी हा पहिला आणि शेवटचा इशारा असल्याचे सांगितले आहे. सध्याचा हा ट्रेलर आहे: अनमोल बिश्नोई फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये अनमोल बिश्नोईने हा ट्रेलर असल्याचं म्हटलं आहे. आम्हाला शांतता हवी आहे. पण, युद्धातूनच न्याय मिळणार असेल, तर त्यासाठीही आम्ही तयार आहोत. पुढच्या वेळी भिंतींवर किंवा रिकाम्या घरात गोळीबार होणार नाही. अनमोलने पोस्टच्या शेवटी लिहिले आहे – जय श्री राम. पाच राऊंड गोळीबार करण्यात आला एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास दोन जणांनी वांद्रे भागात असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर पाच राऊंड फायर केले आणि तेथून पळ काढला. या इमारतीत अभिनेता सलमान खान राहतो. आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिस त्यांच्या घराभोवती लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला पुरावे गोळा करण्यासाठी स्थानिक पोलिस, गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक सायन्स तज्ज्ञांचे पथकही घटनास्थळी पोहोचले असून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. घटनेच्या वेळी सलमान घरी होता की नाही याबाबत पोलिस किंवा सलमानच्या कुटुंबीयांकडून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.
Edited By - Ratnadeep Ranshoor 

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

ये प्रेम मोल लिया’च्या निमित्ताने आयुष्मान खुरानाने साजरी केली पहिली छठ पूजा; अनुभवला खास क्षण

ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांच्यावर दुःखाचा डोंगर; पती जयंत मुखर्जी यांचे निधन

रणबीर कपूरच्या 'रामायण'ने ८ दिवसांत जगभरात १००० कोटींहून अधिक कमाई करत अनेक विक्रम मोडले

हैदराबादमधील अशी काही खास ठिकाणे, जी तुम्हाला परदेशात फिरत असल्याचा अनुभव देतील

सलमान खानच्या 'मातृभूमी' ट्रेलरने एका दिवसापेक्षा कमी वेळात ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा ओलांडला

पुढील लेख
Show comments