सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

टायगरसाठी पाच सुरक्षारक्षक

टायगर श्रॉफची आई आयशा श्रॉफ गेल्या काही दिवसांपासून टायगरच्या सुरक्षेबाबत चिंतेत आहे. त्यांच्या या चिंतेचं कारण टायगरचे चाहते आहेत. अनेकदा कार्यक्रमांमध्ये चाहते टायगरच्या इतक्या जवळ येतात की कधी कधी त्याला दुखापतीचीही शक्यता असते. 
 
'मुन्ना मायकल' चित्रपटाचे प्रमोशन करत असताना टायगरसोबत अशीच एक घटना घडली. त्यामुळे टायगरसोबत यापुढे एक नाही तर पाच सुरक्षारक्षक ठेवण्याचा विचार आयशा करत आहेत. मुन्ना मायकलच्या प्रमोशनसाठी टायगर अहमदाबादमध्ये गेला होता. टायगरला चाहत्यांनी घेरलं. त्याचा सुरक्षारक्षक यावेळी गाडी आणण्यासाठी गेला होता. चाहत्यांची वाढती संख्या पाहता टायगरला तेथून पळावं लागलं.
 
या घटनेत त्याच्या पाठीला दुखापतही झाली. या घटनेसंदर्भात जेव्हा टायगरच्या आईला कळालं तेव्हा त्यांनी यापुढे त्याच्यासोबत पाच सुरक्षारक्षक ठेवण्याचा निर्णय घेतला. पाच सुरक्षारक्षकांशिवाय टायगर बाहेर पडणारच नाही असा नियम त्यांनी केला.