शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 ऑगस्ट 2017 (17:08 IST)

'टॉयलेट एक प्रेम कथा' ची जगभरात जोरदार कमाई

अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांच्या टॉयलेट एक प्रेम कथा सिनेमाने भारतासह जगभरात दमदार कमाई केली आहे. सिनेमाने भारतात बुधवारपर्यंत 89.95 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जगभरातल्या कमाईचा आकडा मिळून ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ने 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे.

koimoi या वेबसाईटच्या आकडेवारीनुसार या सिनेमाने परदेशात चार दिवसांमध्ये 14.59 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यानुसार या सिनेमाने एकूण 104.54 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.  भारतात या सिनेमाने शुक्रवारी 13.10 कोटी, शनिवारी 17.10 कोटी, रविवारी 21.25 कोटी, सोमवारी 12 कोटी, मंगळवारी 20 कोटी आणि बुधवारी 6.50 कोटी रुपयांची कमाई केली.