सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 16 मार्च 2024 (09:28 IST)

‘बारावी फेल’ सर्वोत्कृष्ट चित्रपट; विक्रांत सर्वोत्कृष्ट अभिनेता

Twelfth Fail
क्रिटिक्स चॉईस पुरस्कार सोहळा चैतन्यमय आणि जोशपूर्ण वातावरणात पार पडला. वांद्रे-कुर्ला संकुलातील एका पंचतारांकित हॉटेलात हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
 
यावेळी विधू विनोद चोप्रा यांच्या ‘बारावी फेल’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळाला. अभिनेता अनिल कपूरच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या वेळी विधू विनोद चोप्रा म्हणाले, समीक्षकांच्या नजरेतून हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला, याचा मला आनंद होत आहे. मी सगळ्यांचा आभारी आहे. या वेळी ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ‘बारावी फेल’ चित्रपटासाठी विक्रांत मेस्सीला तर, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून शेफाली शहा (थ्री ऑफ अस) गौरवण्यात आले. सर्वोत्कृष्ट वेबसीरिजचा मान ‘कोहरा’ या सीरिजला मिळाला. तसेच वेबसीरिज विभागातील सर्वोत्कृष्ट अभिनेता सुविंदर विक्की (कोहरा) आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राजश्री देशपांडे (ट्रायल बाय फायर) यांना गौरविण्यात आले. ‘कॉफी विथ करण’साठी सगळ्यात लोकप्रिय कार्यक्रम म्हणून करण जोहरला गौरविण्यात आले. डिस्रे हॉट स्टारला सर्वोत्कृष्ट ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणून पुरस्कार देण्यात आला.
 
या सोहळ्याला अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली होती. त्यामध्ये करण जोहर, विद्या बालन, किरण राव, मौसमी चॅटर्जी, अनिल कपूर, सिद्धार्थ रॉय-कपूर, मीनाक्षी शेषाद्री, विक्रमादित्य मोटवानी, श्रिया पिळगावकर, कोंकणा सेन शर्मा, अमृता सुभाष, दिव्या दत्ता, कबीर खान, अली फजल, रिचा चढ्ढा, स्मिता तांबे, सोनाली कुलकर्णी आदी हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील मंडळींचा समावेश होता.

Edited By - Ratnadeep Ranshoor