Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'६ वर्षे येरवडा जेलमध्ये राहिलो, पण...'; संजय दत्तच्या 'त्या' विधानाने महाराष्ट्रात राजकीय गदारोळ!

Updated: सोमवार, 7 सप्टेंबर 2026 (12:01 IST)
 
काय म्हणाले होते संजय दत्त?
ठाणे येथे शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने आयोजित दहीहंडी कार्यक्रमात संजय दत्त सहभागी झाले होते. या वेळी बोलताना संजय दत्त म्हणाले, "मी ६ वर्षे येरवडा जेलमध्ये राहिलो, तरीसुद्धा मला मराठी भाषा शिकता आली नाही." विशेष म्हणजे संजय दत्त यांनी हे विधान केले तेव्हा त्यांच्या शेजारी उभे असलेले मंत्री प्रताप सरनाईक हसताना दिसले.
 
भाजपा आमदाराची खरमरीत टीका
या संपूर्ण प्रकारावर भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर निशाणा साधला आहे. मेहता म्हणाले की सामान्य रिक्षाचालकांना मराठी भाषा बोलण्यासाठी धमकावले जाते आणि त्यांच्यावर दबाव आणला जातो. दुसरीकडे एखादा मोठा कलाकार मराठी येत नसल्याचे सांगतो, तेव्हा मंत्री त्यावर हसतात. हा कोणता न्याय आहे?
 
मंत्र्यांवर हल्लाबोल
प्रताप सरनाईक यांच्या कथनी आणि करणीत खूप फरक आहे, असा आरोप करत त्यांनी सरनाईक यांचा उल्लेख 'डमी मंत्री' असा केला. संजय दत्त यांचे हे विधान आणि त्यावर मंत्र्यांची झालेली प्रतिक्रिया यामुळे आता सत्ताधारी गोटातच आमनेसामने वाद पेटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सर्व पहा

महान गायिका आशा भोसले यांचा आवाज पुन्हा घुमणार, अखेरचे गाणे या खास दिवशी प्रदर्शित होणार

चंद्रचूड सिंह यांचा नातेवाईकांवर कोट्यवधी रुपयांची वडिलोपार्जित जमीन बळकावल्याचा आरोप एफआयआर दाखल

अमिताभ बच्चन यांना आयएफएस अधिकारी व्हायचे होते, केबीसीच्या नव्या एपिसोडमध्ये खुलासा केला

जेव्हा नेहा धुपियाने करण जोहरला तीन वेळा लग्नाची मागणी घातली, पण प्रत्येक वेळी तिला एकच उत्तर मिळालं

एकता कपूरच्या चित्रपटातून गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा डेब्यू करणार

सर्व पहा

'गांधारी' जागतिक स्तरावर यशस्वी ठरला, ८ देशांमध्ये नंबर १ वर पोहोचला, तापसी पन्नूने व्यक्त केला आनंद

भगवान शिवाचे रहस्यमयी मंदिर; जिथे येतो दगडांमधून डमरूचा आवाज

मनोज बाजपेयी महात्मा गांधींच्या भूमिकेत, चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर

Bigg Boss 20: 'बिग बॉस'चा २०वा सीझन मध्ये मनोज तिवारी यांची मुलगी रीतीची एन्ट्री

कार्तिक आर्यनने त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली

पुढील लेख
Show comments