कंगनावर आरोप, शूटिंगदरम्यान कोणाचेच ऐकत नाही
कंगणावर (kangana ranaut) वारंवार असे आरोप लागले आहेत की, शूटिंगदरम्यान कंगना कोणाचेही ऐकत नाही सर्व काम आपल्या मनाने करते. आता दिग्दर्शक हंसल मेहता यांनी कंगणाबरोबरचा अनुभव सांगितला आहे.
२०१७ मध्ये त्यांनी सिमरन हा चित्रपट केला होता. यामध्ये कंगना (kangana ranaut) मुख्य भूमिकेत होती. हंसल यांनी या अनुभवाला वेदनादायक सांगितले आहे. हंसल मेहता म्हणाले की, माझ्याकडे असा एक अनुभव आहे त्याच्याबद्दल मी विचारही करू शकत नाही.
त्यांनी सांगितले की, जर मी हा चित्रपट बनवला नसता तर बरे झाले असते. हंसल मेहता यांच्या मनात कंगना बद्दल काहीच द्वेष नाहीये उलट कंगना आणि हंसल मेहता हे खूप चांगले मित्र आहेत.
पण शूटिंगच्या वेळी गोष्ट वेगळीच होती. हंसल म्हणाले की, सेटवरती कंगनाने पूर्ण चार्ज आपल्या हातात घेतला होता. कंगना सेटवरच्या दुसऱ्या दिग्दर्शकांनासुद्धा सूचना देत होती. चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्यांना अर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले त्यामुळे त्यांच्या मेंटल हेल्थवर खूप परिमाण झाला होता.
एवढं सगळं झाल्यानंतरही हंसल म्हणाले की, माझ्या मनात कंगनाबद्दल काहीच वाद नाहीये मी अजूनही कंगनाबरोबर काम करायला मला काहीच हरकत नाही. सगळ्या गोष्टी जर बाजूला ठेवल्या तर कंगना एक खूप चांगली अभिनेत्री आहे.
भविष्यात आम्ही एकत्र एक चित्रपट करू शकतो. मनामध्ये द्वेष ठेवणे काही कामाचे नाही. सिमरन हा चित्रपट बऱ्यापैकी बॉक्स ऑफिसवर चालला होता. प्रेषकांचे चांगल्या प्रतिक्रिया आल्या होत्या, असे हंसल मेहता म्हणाले.