Festival Posters

आशुतोषने घेतलेली रिस्क

Published: बुधवार, 23 सप्टेंबर 2009 (15:22 IST)
' लगान', 'स्वदेस' आणि 'जोधा अकबर' असे बिगबजेट आणि तगडी स्टारकास्ट असलेले चित्रपट बनविणार्‍या आशुतोष गोवारीकरने आता रोमॅंटिक कॉमेडी हाताळायचे ठरवले आहे. 'व्हॉट्स यूवर राशी' हा त्याचा आगामी चित्रपट यातलाच आहे. हा चित्रपट यशस्वी झाल्यास आशुतोष असेही चित्रपट यशस्वी करू शकतो, हे सिद्ध होईल.

एका गुजराती कादंबरीवर आधारीत हा चित्रपट आहे. एका मुलाला दहा दिवसांत लग्न करायचे असते त्यासाठी त्याला बारा राशींच्या बारा मुलींना भेटावे लागते. यातलीच एक मुलगी त्याला निवडायची आहे, अशी चित्रपटाची थीम आहे. चित्रपटाचा शेवट मात्र काहीसा बदलला आहे. कादंबरीसारखा नाही.

यात प्रियंका चोप्राने बारा भूमिका केल्या आहेत. वास्तविक या बारा भूमिकांसाठी बारा हिरॉईन्स घेणे अवघड नव्हते. पण त्यामुळे गोंधळ वाढला असता आणि कुणाला किती महत्त्व मिळाले याचीच चर्चा रंगली असती. या चित्रपटात हिरो हरमन बावेजा आहे. यापूर्वी आशुतोषने आमीर खान, शाहरूख खान, ह्रतिक रोशन, ऐश्वर्या राय यांच्यासारख्या बड्या कलावंतांबरोबर काम केले आहे. यावेळी पहिल्यांदाच त्याची स्टारकास्ट कमकुवत भासते आहे. हरमनला स्टार व्हॅल्यू नाही. त्याचे या आधीचे चित्रपट पडलेले आहेत. तरीही आशुतोषने हिरो म्हणून त्यालाच ठेवले आहे. एवढी रिस्क घेऊनही आशुतोष याकडे आव्हान म्हणून पहातो. आता बघूया हा चित्रपट यशस्वी ठरतो की काय ते?

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

72nd National Film Awards: 'आर्टिकल ३७०' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा, तर कार्तिक आर्यन आणि ममूटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला

कार्तिक आर्यनला त्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला; कुटुंबासोबत विजयाचा आनंद साजरा केला

रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर लीक, यशचा रावणाचा अवतारही दिसला

जान्हवी कपूरला एक नवीन चित्रपट मिळाला, या दिग्दर्शकासोबत काम करणार

सनी देओलच्या 'पार्टिशन १९४७' चा टीझर प्रदर्शित; फाळणीची हृदयद्रावक कथा अंगावर काटा आणेल

सर्व पहा

अनुराग कश्यपचा 'चार दीवारी' आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला, फँटासिया फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये प्रदर्शित होणार

"मास्क घालून विद्यार्थ्यांवर अत्याचार?" NEET आंदोलनावरील लाठीमारावर संतापले नसिरुद्दीन शाह; म्हणाले– लढा सुरूच ठेवा!

18 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू

बिग बॉस २० ची घोषणा, सलमान खान पुन्हा एकदा सूत्रसंचालन करणार

हिमाचल प्रदेशच्या खोऱ्यांमध्ये वसलेले जिभी, पर्यटकांची पहिली पसंती बनले

Show comments