Dharma Sangrah
✕

मुंबई होते उद्योगनगरी

- सौ. भाग्यश्री कुलकर्णी

Updated: बुधवार, 15 एप्रिल 2009 (12:35 IST)
' मुंबई होते उद्योगनगरी' या गंगाधर गाडगीळ लिखित छोटेखानी पुस्तक वाचनीय ठरले आहे. आज मुंबई देशाची आर्थिक राजधानी असली तरी या राजधानीचा पाया कसा आणि कुणी घातला? त्यावेळच्या रंजक आठवणी यात ओघवत्या शैलीत मांडल्या आहेत.

मुंबईच्या विकासात जमशेदजी टाटा यांच्या महत्त्वपूर्ण सहभागाबरोबरच पुढे येऊ घातलेल्या कामगार चळवळीचा पायाही कसा उभा राहिला याचा रंजक इतिहासही यात आहे.

मुंबईत 1880 साली सुरू झालेल्या पहिल्या कापड गिरणीच्या सुरवातीचा इतिहास, त्यावेळचे हिंदुस्थानातील वातावरण, देशी व विदेशी व्यापार्‍यांचा अंतर्गत संघर्ष, त्यातूनच विदेशी व्यापार्‍यांनी स्थानिक कामगारांच्या सोयी सुविधांसाठी दिलेला पाठिंबा याची माहिती मुळातून जाणून घेण्यासारखी आहे.

जमशेदजी टाटांच्या वेगवेगळ्या उद्योग उभारणीची माहिती तर आहेच पण त्यांचे दूरदर्शी विचार, कापड गिरणी नागपूरला मध्यवर्ती म्हणून सुरू करण्यातला दुरदर्शीपणा व त्यातून पुढे उभी राहीलेली वस्त्र उद्योगाची बाजारपेठ यांची चांगली माहिती मिळते.

यात जमशेदजींच्या उद्योगांचा चढता आलेख आहे तशीच कामगार चळवळीचे आद्य नेते नारायण मेघाजी लोखंडे यांचीही माहिती व ते कसे या चळवळीचे प्रणेते बनले याचीही माहिती या पुस्तकात आहे.

ह्या पुस्तकातील माहिती उद्‍बोधक तर आहेच पण ती अजून थोड्या विस्तृत स्वरूपात असती तर वाचनाचा आनंद द्विगुणीत झाला असता.

पुस्तकाचे ना व- मुंबई होते उद्योगनगरी
लेख क- गंगाधर गाडगीळ
प्रकाश क- ग्रंथायन प्रकाशन
पाने- ५६
किंम त- ६० रूपये
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

लोकरीच्या स्वेटरमुळे खाज आणि पुरळ येतात का? जाणून घ्या हिवाळ्यात त्वचेचे संरक्षण कसे करावे

पोषक तत्वांनी समृद्ध आणि पचायला सोपी; केळी लहान मुलांसाठी खूप फायदेशीर

बाजारचा केमिकलमुक्त लसूण कशाला हवा? घरच्या घरी लसूण उगवण्याची सर्वात सोपी पद्धत!

Beauty Tips: वधूच्या मेकअप किटमध्ये या पाच लिपस्टिक शेड्सचा आवर्जून असायलाच हवा

भाजीला काही नसेल तर १० मिनिटांत बनवा झणझणीत 'हिरव्या लसणाचा ठेचा'

Show comments