suvichar
✕

डोळ्यांना नवसंजीवनी देणारे डॉ. हार्डिया

Updated: शुक्रवार, 31 ऑक्टोबर 2008 (16:45 IST)
WD
आपल्या नावाची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड'मध्ये नोंद झाली आहे, याबाबत काही सांगू शकाल?
' गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड'मध्ये नाव आल्याने कोणी मोठं होत नाही. कुठलाही व्यक्ती त्याच्या कार्याने मोठा होत असतो. कार्य जर निष्ठा आणि निस्वार्थीपणाने केले असेल तर ती मोठी गोष्ट आहे. व्यक्तीच्या आयुष्यात डोळ्यांचे किती महत्त्व असते, हे मला वडिलांनी लहानपणीच सांगून ठेवले होते. त्यामुळे भारतभरातून येणार्‍या नेत्ररोग पिडीतांना मी कधीच निराश करत नाही.

आपल्या रूग्णालयात गरीब, गरजुंसाठी विशेष सवलत दिली जाते?
खरं आहे. रूग्णालयात येणार्‍या प्रत्येक गरीब व गरजू नागरिकांची मी मदत करतो. 24 तास कमी मोबदल्यात काम करणार्‍या नागरिकांकडून मी फी घेतली तर ते कुणाला तरी लुटतील. मला अशा पैशाची काहीच गरज नाही.

आपल्या रूग्णालयातील सुविधांबाबत काही सांगा ?
माझ्या रूग्णालयात अत्याधुनिक सुविधा बसविण्यात आली आहे. आशियात लेजर मशीन आणारा मी पहिलाच आहे. आर्कची सर्जरी ही केवळ ‍रशिया अथवा अमेरीकेमध्येच होत होती. मुलांचा लहानपणात चष्म्याचा नंबर वाढण्याच्या समस्येला कुठल्या मार्गाने थांबवता येईल, या संदर्भात रिसर्च करून त्या दिशेने माझे निरंतर कार्य सुरू आहे.

WD
निशुल्क शिबिराच्या आयोजनामागे काय उद्देश आहे?
आम्ही वर्षातून दोन वेळा शिबिराचे आयोजन करतो. पहिले म्हणजे 19 मार्चला, त्या दिवशी माझ्या वडिलांची जन्मतिथी असते व दुसरे म्हणजे त्यांच्या पुण्यतिथीला दि. 10 ऑगस्ट रोजी. या माध्यमातून गरीबांची सेवा करणे हाच प्रमाणिक उद्देश आहे. 1981 सालापासून कधी न खंड पडता शिबिराची परंपरा सुरू आहे.

आज प्रत्येक कार्यालयात कॉम्प्यूटर आले आहेत. त्यावर काम करणार्‍यांच्या डोळ्यांचे रक्षण कसे केले जाऊ शकते?
आपल्या डोळ्यांमध्ये एक 1 मि.मी.चा पडदा असतो. त्याला मॅक्यूला म्हणतात. मॅक्यूलाला जास्त वेळ व्यस्त ठेवणे डोळ्यांसाठी घातक असते. त्यामुळे कॉम्प्युटरवर काम करणार्‍यांनी थोड्या थोड्या अंतराने डोळ्यांना आराम दिला पाहिजे. तसेच सतत चालू लाईट व टीव्ही पाहिल्याने ही मॅक्यूला लवकर निकामी होतो.

सर्जरी न करता चष्मा सोडला जाऊ शकतो?
सर्जरी तर करावीच लागते. तंत्र-मंत्र किंवा गळ्यात ताईत बांधून जरी चष्मा सोडला जाऊ शकत असेल, मात्र यावर माझा विश्वास नाही. डोळ्यात असलेल्या बाहुलीचा आकार जेव्हा लहान-मोठा होतो तेव्हा चष्मा लागतो. त्यामुळे त्यावर शस्त्रक्रिया करावीच लागते.

वेबदुनियाच्या वाचकांसाठी आपण काय संदेश देऊ इच्छिता?
आपल्या कार्यावर निष्ठा ठेवा. उगीच पैशाच्या मागे धावू नका. आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद...
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सुरकुत्या आणि सैल त्वचेमुळे त्रस्त आहात का? अपराजिताच्या फुलांचा वापर करून घरीच नाईट क्रीम बनवा

जातक कथा : जसे पेराल, तसे उगवेल....शिंपी आणि हत्तीची गोष्ट

लग्नानंतर लेकीला रोज फोन करताय? ही आईची काळजी की संसारात नकळत होणारी ढवळाढवळ?

सकाळच्या नाश्त्यापासून ते दुपारच्या जेवणापर्यंत गाजरापासून बनवा चविष्ट पदार्थ

सावळ्या त्वचेसाठी लिपस्टिकच्या या शेड्स निवडा! तुम्ही अगदी सुंदर दिसाल...

Show comments