Daily Horoscope
✕

राज्यात ३,६७० नवीन कोरोना रुग्णांची नोंद

Updated: शनिवार, 13 फेब्रुवारी 2021 (08:32 IST)
 
राज्यात शुक्रवारी ३६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४, ठाणे, २, रायगड २, नाशिक २, सोलापूर ४, सिंधुदुर्ग २, औरंगाबाद २ आणि यवतमाळ ४ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ३६ मृत्यूंपैकी १९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४ मृत्यू रायगड २, ठाणे १ आणि अमरावती १ असे आहेत.
 
शुक्रवारी २,४२२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आता पर्यंत एकूण १९,७२,४७५ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९१ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५२,१९,४१६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,५६,५७५ (१३.५१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,६८,०८७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर १,७८९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर महाराष्ट्र सरकारचा कडक बडगा; राज्यभर तपासणी मोहीम राबवणार

पॅरिसमध्ये बांधलेले युरोपातील सर्वात मोठे अक्षरधाम मंदिर

LIVE: मनोज जरांगे पाटील यांनी जालना अंतरवाली सराटी ते आझाद मैदानपर्यंत मोर्चाची घोषणा केली

मुंबईतील १०० बीएमसी शाळांमध्ये बाल सुरक्षा मोहीम राबवली जाणार

एसआरएने मुंबईतील ४७१ विकासकांना प्रकल्पांमधून काढून टाकले

पुढील लेख
Show comments