Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Black Fungus: डोळे-नाक-जबड्यावर काळी बुरशीचा हल्ला, सरकार ने सांगितले लक्षणं व बचावाचे उपाय

Updated: शनिवार, 15 मे 2021 (13:40 IST)
 
लक्षणं- ब्लॅक फंगसचे मुख्य लक्षणं डोळे लाल होणे किंवा वेदना जाणवणे, ताप, डोकेदुखी, खोकला, श्वास घेण्यास त्रास, उलटीत रक्त येणं किंवा मानसिक स्थितीत परिवर्तन. या लक्षणांवर बारकाईने नजर ठेवली पाहिजे.
 
कशा प्रकारे पसरतं- एक्सपर्ट्सप्रमाणे हवेत पसरलेल्या जंतूंच्या संसर्गामुळे एखादी व्यक्ती बुरशीजन्य संसर्गाचा बळी बनू शकते. रुग्णाच्या त्वचेवरही काळा बुरशीचा विकास होऊ शकतो. त्वचेवर जखम, घासल्यामुळे किंवा जळजळ होण्यामुळे हे शरीरात प्रवेश करू शकते.
 
म्युकरमायकोसिस पासून कसे वाचाल- ब्लॅक फंगसपासून बचावासाठी धूळ असलेल्या ठिकाणांवर मास्क लावून जावे. माती, शेवाळ किंवा खाद या सारख्या वस्तूंजवळ जाताना जोडे, ग्लव्ज, फुल स्लीव्स कपडे घालावे. स्वच्छतेकडे लक्ष द्यावं. मधुमेहावर नियंत्रण, इम्युनोमॉड्यूलेटिंग ड्रग किंवा स्टेरॉयडचं कमीत कमी वापर करावं.
 
Black Fungus पासून बचावासाठी काय करावे- हायपरग्लीसीमिया (ब्लड शुगर) नियंत्रित ठेवा. कोविड-19 हून रिकव्हरीनंतर ब्लड ग्लूकोज लेवल मॉनिटर करत राहा. स्टिरॉइडचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करा. ऑक्सिजन थैरेपीच्या वेळी ह्यूमिडिडिफायरसाठी स्वच्छ पाण्याचा वापर करा. जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच अँटीबायोटिक्स किंवा अँटीफंगल औषधे वापरा.
 
काय टाळावे- ब्लॅक फंगसपासून बचावासाठी याच्या लक्षणांकडे मुळीच दुर्लक्ष करु नका. बंद नाक असलेल्या सर्व प्रकरणांना बॅक्टीरियल साइनसाइटिस समजण्याची चूक करु नका. विशेष करुन कोविड-19 व इम्यूनोसप्रेशन प्रकरणात अशी चूक करु नका.
 
फंगल एटियोलॉजी बद्दल माहिती करण्यासाठी KOH टेस्ट व मायक्रोस्कोपीची मदत घेयला घाबरु नका. जर डॉक्टर्स लगेच उपचार घेण्यास सांगत असल्यास दुर्लक्ष करु नका. रिकव्हरीनंतर देखील सांगण्यात आलेल्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका कारण बर्‍याच प्रकरणांमध्ये, अगदी बुरशीजन्य संसर्गामध्ये रिकव्हरी झाल्यावरही एका आठवड्यात किंवा महिन्याभरानंतर पुन्हा झाल्याचे पाहिले गेले आहे.
 
उल्लेखनीय आहे की म्युकरमायकोसि‍सचे प्रकरण आता महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये देखील वाढत आहे. सध्या गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड, झारखंड व राजस्थान येथे ब्लॅक फंगसचे प्रकरणं पाहायला ‍मिळत आहे. यामुळे रुग्णाच्या डोळ्याला, नाकाच्या हाडांना आणि जबड्यालाही बरेच नुकसान होऊ शकते.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रात जंतर मंतरपेक्षाही मोठे आंदोलन होणार! काँग्रेसच्या खासदाराचा दावा

सर्वोच्च न्यायालयाने 'आर्ट ऑफ लिव्हिंग'ला यमुना नदीच्या पूरक्षेत्राचे पर्यावरणीय नुकसान केल्याच्या सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त केले

भंगार उतरवताना वाहनाच्या डिझेल टाकीचा स्फोट होऊन दोन मुलांसह चार जणांचा मृत्यू

महिलांची ओळख केवळ पत्नी, मुलगी आणि आई एवढीच नाही... तर भारताची सर्वात मोठी ताकद; पुण्यात राहुल गांधी गरजले

गोंदियामध्ये १२६ मलेरियाचे रुग्ण आढळले; देवरीमध्ये एकाचा मृत्यू

पुढील लेख