suvichar
✕

कोरोनाने पुन्हा एकदा दार ठोठावले, कोरोनाच्या रुग्णात वाढ

Updated: शनिवार, 9 डिसेंबर 2023 (17:13 IST)

जगभरात हजारो लोकांचा बळी घेणाऱ्या कोरोना महामारीने पुन्हा एकदा कहर केला आहे. हिवाळा सुरू होताच भारतात कोरोना विषाणूची अनेक नवीन प्रकरणे समोर आली आहेत. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे.
 
भारतात एका दिवसात कोरोना विषाणू संसर्गाची 148 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या शनिवारी अपडेटेड डेटामध्ये संक्रमित लोकांची माहिती देण्यात आली आहे. आज सकाळी 8 वाजताची आकडेवारी अपडेट झाल्यानंतर रुग्णांची संख्या वाढली आहे. रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 808 वर पोहोचली आहे, जी लोकांसाठी चिंताजनक आहे.
 
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 4 कोटी 50 लाख 2 हजार 889 आहे. मृतांची संख्या 5 लाख 33 हजार 306 आहे.
आरोग्य विभागाने जारी केलेल्या आरोग्य अहवालानुसार, कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर 4 कोटी 44 लाख 68 हजार 775 लोक बरे झाले आहेत. देशात संसर्गातून बरे होण्याचे प्रमाण 98.81 टक्के आहे तर मृत्यूचे प्रमाण केवळ 1.19 टक्के आहे.
 
कोरोना महामारीनंतर आता चीनमध्ये आणखी एक रहस्यमय न्यूमोनियाचा संसर्ग पसरत आहे. या संसर्गाबाबत केंद्राने आधीच अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसने भारतात पुन्हा एकदा थैमान घातलं आहे, जे देशवासियांसाठी चिंतेचे कारण आहे.

Edited by - Priya Dixit  
 
 

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

"संजय राऊत 'सर्किट', त्यांना रुग्णालयात भरती करा!" निलेश राणे यांच्या विधानामुळे राजकारणात खळबळ

सुप्रिया सुळे 'इंडिया' आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, थेट दिल्लीला जाणार

BMW ची नवीन सुपरबाइक 'M 1000 RR' भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि प्रमुख वैशिष्ट्ये

मोदी मंत्रिमंडळाकडून सीमांकन विधेयकाला आणि महिला आरक्षण दुरुस्तीलाही मंजुरी

LIVE: महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी "अनाथांचा नाथ दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान'' योजनेची घोषणा

पुढील लेख