Festival Posters
✕

कोरोना लस : डेल्टा व्हेरियंटवर कोव्हॅक्सिन 65.2% परिणामकारक, भारत बायोटेकचा दावा

Updated: शनिवार, 3 जुलै 2021 (22:54 IST)
 
18 ते 98 वयोगटातल्या 25,800 लोकांवर या चाचण्या घेण्यात आल्या. देशभरात 25 ठिकाणी या चाचण्या घेण्यात आल्या.
 
भारत बायोटेकच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांचे निकाल
 
* असिम्प्टमॅटिक (लक्षणं न दिसणाऱ्या) कोव्हिडपासून 63% संरक्षण.
 
* सिम्प्टमॅटिक म्हणजे लक्षण आढळणाऱ्या सौम्य आणि मध्यम संसर्गापासून 78% संरक्षण.
 
* गंभीर कोरोना संसर्ग होण्यापासून आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागण्यापासून 93% संरक्षण.
 
*B.1.617.2 म्हणजेच डेल्टा व्हेरियंटपासून 65.2% संरक्षण.
 
 
कोव्हॅक्सिन काय आहे?
कोव्हॅक्सिन एक इनअॅक्टिव्हेटेड व्हॅक्सिन आहे म्हणजे यात मृत कोरोना व्हायरस वापरला आहे. ही लस शरीरात गेली तर कोरोना व्हायरसला संपवू शकते, पण त्याने काही धोका होत नाही.
 
ही लस भारत बायोटेकने बनवली आहे. भारत बायोटेकला गेल्या 24 वर्षांचा अनुभव आहे. या काळात त्यांनी 16 लशी बनवल्या आहेत आणि 123 देशांमध्ये निर्यात केल्या आहेत.
 
भारत बायोटेकने ही लस बनवताना भारताच्या राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्थेने अलग केलेल्या कोरोना व्हायरसचं सॅम्पल वापरलं होतं.
 
ही लस दिल्यानंतर शरीरातल्या रोगप्रतिकारक शक्ती मेलेल्या कोरोना व्हायरसची रचना ओळखू शकते. याने रोगप्रतिकारक शक्तीला कोरोना व्हायरस कसा आहे हे समजतं ज्यायोगे त्याच्याशी लढता येतं.
 
28 दिवसांच्या अंतराने या लशीचे 2 डोस घ्यावे लागतात.
 
 
 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला सुरुवात, लालबाग गणेशोत्सवाचे मुख्य केंद्र बनले; पोलीस कर्मचारी तैनात

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI ने FIR दाखल केला, आता केंद्रीय तपास यंत्रणा तपास करणार

LIVE: महाराष्ट्रात ५,००० नवीन लालपरी बसेस धावणार

मुंबईत अमित शाह यांची मोठी घोषणा, २०२९ पूर्वी २१ राज्यांमध्ये समान नागरी संहिता (UCC) लागू केली जाईल

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशव्यापी 'सेवा संकल्प अभियान'; अमित शाह यांची मुंबईत घोषणा

पुढील लेख