Daily Horoscope
✕

कोरोना विषाणू : ४१ प्रवाशांपैकी ४० जणांचा अहवाल निगेटिव्ह

Updated: शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020 (13:03 IST)
कोरोना विषाणूबाधित भागातून आलेल्या राज्यातील 41 प्रवाशांपैकी 40 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. रुग्णालयात निरीक्षणाखाली दाखल असलेल्या 41 पैकी 39 जणांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या पुणे, मुंबई येथे प्रत्येकी एक जण दाखल आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत २७ हजार ८९४ प्रवासी तपासण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.  
 
राज्यात बाधित भागातून १७३ प्रवासी आले आहेत. त्यापैकी ९० प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ४१ जणांना भरती करण्यात आले होते. त्यामध्ये काल संध्याकाळी एका प्रवाशाला सर्दी, खोकला अशी सौम्य लक्षणे आढळल्याने पुणे येथील नायडू रुग्णालयात भरती करण्यात आले तर एकाला मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यात आले. भरती करण्यात आलेल्यांपैकी ४० जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एनआयव्ही पुणे यांनी दिला आहे. एका प्रवाशाचा प्रयोगशाळा अहवाल उद्यापर्यंत प्राप्त होईल.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

LIVE: पुणे विमानतळावरून भुवनेश्वरसाठी नवीन विमानसेवा सुरू

पत्नीला कॅप्सूलमधून ब्लेडचे तुकडे खाऊ घातल्याचा आरोप; पुणे न्यायालयाकडून पतीला ७ वर्षांची शिक्षा

आशियाई पॅरा गेम्सच्या समारोप समारंभात मोना अग्रवाल आणि निशाद कुमार हे भारतीय ध्वजवाहक होते

अरुणाचल प्रदेशात ११,२०० मेगावॅट प्रकल्पाविरोधात हिंसाचार, दगडफेकीत ४० हून अधिक पोलीस अधिकारी जखमी

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थाची तयारी जोरात सुरू असून, ३१ ऑक्टोबर रोजी धार्मिक ध्वज फडकवण्यात येणार

पुढील लेख
Show comments