Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ‘अनलॉक ३’ मधील नवे नियम जाहीर

Updated: गुरूवार, 30 जुलै 2020 (08:52 IST)
 
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, १ ऑगस्टपासून अनलॉक ३ च्या टप्प्याला सुरुवात होत असून यावेळी कंटेनमेंट झोनबाहेर असणारे निर्बंध अजून शिथील करत अनके गोष्टी सुरु कऱण्यास परवानगी देण्यात येत आहे. केंद्रशासित प्रदेश, राज्यं सरकार तसंच इतर महत्त्वाच्या विभागांशी चर्चा करुन हा निर्णय घेतला आहे.
 
काय सुरु, काय बंद ?
– नाइट कर्फ्यू हटवण्याचा निर्णय. यामुळे रात्री फिरण्यावरील बंदी हटली आहे.
– योगा इन्स्टिट्यूट आणि व्यायामशाळा ५ ऑगस्टपासून सुरु करण्याची परवानगी. सोशल डिस्टन्सिंग आणि करोनाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून महत्त्वाचे निर्देश देण्यात येणार आहेत
– सोशल डिस्टन्सिंग आणि इतर आरोग्याशी संबंधित नियमांचं पालन करत स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी.
– राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत चर्चा केल्यानंतर शाळा, कॉलेज आणि कोचिंग संस्था ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय
– आंतरराष्ट्रीय प्रवाशांना वंदे भारत मिशन अंतर्गत मर्यादित प्रवासा परवानगी.
– कंटेनमेंट झोनसोबत बाहेर मेट्रो रेल, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, चित्रपटगृह, बार, सभागृह बंदच राहणार
– कंटेनमेंट झोनसोबत बाहेर सामाजिक, स्पोर्ट्स, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाही.
 
परिस्थितीचा विचार करुन या गोष्टी कधी सुरु करायच्या याबाबत निर्णय घेतला जाईल असं केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाउनची कठोर अमलबजावणी केली जावी असं गृहमंत्रालयाने राज्य सरकारांना सांगितलं आहे. कंटेनमेंट झोनमध्ये फक्त अत्यावश्यक गोष्टींना परवानगी असणार आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: शुक्रवारी सकाळी ५:३२ वाजता नाशिकमध्ये ३.४ तीव्रतेचा भूकंप

LIVE: बीएमसीने स्वातंत्र्यदिनी प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले

मुंबईत 'हर घर तिरंगा': बीएमसीने स्वातंत्र्यदिनी प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्याचे आवाहन नागरिकांना केले

१० लाख द्या, ३० लाख घ्या! नाशिकमध्ये बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

रक्षाबंधनच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना महाराष्ट्र सरकारकडून विशेष भेट मिळण्याची शक्यता

पुढील लेख
Show comments