गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 मार्च 2020 (16:41 IST)

राज्यात लष्कराची नियुक्ती करण्यात यावी, केंद्राकडे केली मागणी

महाराष्ट्रामधील करोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस वाढतच चाललेली आहे. आता राज्य सरकारने केंद्राकडे मदत मागितली आहे. विशेष म्हणजे गरज पडल्यास राज्यामध्ये लष्कराची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केल्याचे समजते. एका खासगी वेबसाईटने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे
 
करोना व्हायरसविरोधातील लढाईसाठी भारतीय लष्करही पूर्णपणे सज्ज असून करोनाविरोधातील मोहिमेला भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन नमस्ते’ नाव दिले आहे. असं असतानाच आता राज्य सरकारने केंद्राकडे गरज पडल्यास लष्कर पाठावे अशी मागणी केल्याचे वृत्तसमोर येत आहे.