शनिवार, 25 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 23 मार्च 2020 (17:50 IST)

मुंबईत उपाहारगृहे उघडी ठेवता येतील पण 'या' काही अटीं आहेत

whole mumbai
मुंबईतील अत्यावश्यक सेवा कोणकोणत्या असतील याबाबतची नियमावली तयार केली आहे. या नियमावलीत उपाहारगृहे काही अटींवर सुरु ठेवता येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अटींनुसार उपाहारगृह, कॅफे, ढाबा सुरु ठेवता येणार आहेत. मात्र एका वेळी क्षमतेच्या 50 टक्केच ग्राहक बसतील, याची काळजी मालकांना घ्यावी लागणार आहे. दोन ग्राहकांमध्ये तीन फुटांचे अंतर ठेवून त्यांची आसनव्यवस्था करावी लागणार आहे. तसेच खाद्यपदार्थ घरी घेऊन जाण्यास किंवा घरपोच देण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
 
पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, बँकिंग सेवा आणि रिझव्‍‌र्ह बँक, विमा कंपन्या, टेलिफोन आणि इंटरनेट सेवा, रेल्वे आणि सार्वजनिक परिवहन सेवा, खाद्यपदार्थ, भाजीपाला, किराणा माल पुरवठादार, रुग्णालये, दवाखाने, औषधांची दुकाने, वीज, इंधन, पेट्रोल पुरवठादार, प्रसारमाध्यमे, बंदरे, अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या आयटी कंपन्या, परदेशी वकिलात, जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या, मालवाहतूक, पुरवठादार, पेस्ट कंट्रोलची सेवा इत्यादींचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करण्यात आला आहे.