1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 23 मार्च 2020 (14:29 IST)

पुण्यात परदेशातून आलेले काहीजण क्वारंटाईनमधून बेपत्ता

Some Quarantine People Missing from Pune
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार सतत प्रयत्न करत असून लोकांना देखील सहकार्याचे आवहन करत आहे. परंतू पुण्यात परदेशातून आलेले काही नागरिक क्वारंटानमधून बेपत्ता झाले आहेत. 
 
परदेशातून भारतात आलेल्या नागरिकांना 14 दिवस क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात येत असला तरी अनेक ठिकाणी या नियमांचं उल्लंघन केलं जातं आहे. पुण्यात देखील क्वारंटाईनमधील काही जण बेपत्ता झाल्यामुळे पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे.
 
पुणे पोलिसांनी आवाहन केलं आहे की बेपत्ता झालेले लोक हजर झाले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. पुणे पोलिसांनी पुणेकरांनाही आवाहन केलं आहे की क्वारंटाईनचा शिक्का असलेली व्यक्ती दिसली तर आम्हाला १८००२३३४१३० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.