suvichar
✕

PAK vs AFG: अफगाणिस्तानने पाकिस्तानला धूळ चारली, वर्ल्डकपमध्ये पराभवाची हॅट्ट्रिक

Updated: सोमवार, 23 ऑक्टोबर 2023 (22:21 IST)
 
 पाकिस्तानचा सलामीचा फलंदाज अब्दुल्ला शफीकने शानदार अर्धशतकी खेळी केली. त्याने 58 धावांची इनिंग खेळली, मात्र या विकेटनंतर कर्णधार बाबर आझम सर्व जबाबदारी सांभाळताना दिसला. याशिवाय रिझवान, इमाम आणि सौद शकील स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. बाबरने 74 धावांची खेळी खेळली आणि डावाच्या शेवटी, शादाब आणि इफ्तिखारच्या 40-40 धावांच्या जलद डावाने बूस्ट मोड म्हणून काम केले आणि 282 धावा धावफलकावर लावल्या. अफगाणिस्तानने या सामन्यात युवा फिरकी गोलंदाज नूर अहमदवर सट्टा खेळला, जो पूर्णपणे यशस्वी ठरला. या सामन्यात नूरने 3 महत्त्वाच्या फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवले.
 
अफगाणिस्तानच्या सलामीवीरांनी फलंदाजीत धुमाकूळ घातला
283 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघाच्या सलामीवीरांनी पाकिस्तानला धमकावण्यास सुरुवात केली. रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांच्यासमोर पाकिस्तानच्या सर्व शक्ती अपयशी ठरल्याचं दिसत होतं. गुरबाजने 65 धावांची खेळी केली तर जद्रानने 87 धावा केल्या. यानंतर रहमत शाहनेही वाहत्या गंगेत हात धुवून अर्धशतक केले. त्याने 77 धावांची नाबाद खेळी खेळली. अफगाणिस्तानने पाकिस्तानला हरवून इतिहास रचला आहे. याआधी या संघाने पाकिस्तानला एकदिवसीय सामन्यात पराभूत केले नव्हते. पण यावेळी अफगाणिस्तानने मोठ्या मंचावर पाकिस्तानचा 8 विकेट्सने पराभव केला आहे.
 
पाकिस्तानी संघातील शाहीन आफ्रिदीपासून हरिस रौफसारखे गोलंदाज अपयशी ठरले. शाहीनने या सामन्यात एक विकेट घेतली. याशिवाय हसन अलीनेही यश संपादन केले. अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी एकूण 5 बळी घेतले, तर पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी एकही विकेट घेतली नाही.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

आयपीएल २०२७ लिलावापूर्वी सीएसकेला मोठा धक्का, आयुष म्हात्रे ३ महिन्यांसाठी संघाबाहेर

IND W vs ZIM W: प्रतिका रावलने झिम्बाब्वेविरुद्ध शतक झळकावले, भारताने ९ गडी राखून सामना जिंकला

IND A vs NZ A : टीम इंडिया एकाच दिवशी टी-२० आणि कसोटी सामना खेळणार

पायाच्या दुखापतीमुळे इशान किशन दुसऱ्या टी२० सामन्यातून बाहेर

श्रीलंकेने ४३० धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला २ गडी राखून पराभूत करून इतिहास रचला

पुढील लेख
Show comments