Festival Posters
✕

Diwali Sweet Recipe: यंदा दिवाळीला चमचम करून बघा , रेसिपी जाणून घ्या

Updated: शनिवार, 28 ऑक्टोबर 2023 (17:06 IST)
 
साहित्य- 
पनीर - 2 कप
पिठी  साखर - 2 वाट्या 
तूप- 1 टेबलस्पून
पाणी - 2 कप 
दूध पावडर- 1/2 कप
मैदा - 1 टेबलस्पून
 वेलची पूड 
केशर - 1/4 टीस्पून
दूध - 1 कप
 
कृती- 
सर्व प्रथम, पनीर घ्या आणि त्यात एक चमचा मैदा घाला आणि चांगले मिसळा. नंतर मऊ पिठाप्रमाणे मळून घ्या. पिठाचा छोटा गोळा घेऊन त्याला गोल आकार द्या. ही प्रक्रिया पुन्हा करा आणि पिठाचे हवे तितके गोळे करा. 
 
यानंतर पॅनमध्ये दोन वाट्या पाणी आणि एक वाटी साखर घाला. साखर विरघळेपर्यंत ते उकळत रहा. नंतर दोन वेलची घालून तयार केलेले गोळे पाकात टाका. आता पाक  हळू हळू फिरवा. नंतर त्यावर झाकण बंद करा आणि 10 मिनिटे ठेवा आणि पूर्णपणे थंड होऊ द्या.
 
आता एका कढईत एक चमचा तूप घाला .तूप वितळले की एक छोटा कप दूध घाला. यानंतर दूध पावडर मिसळा. नीट ढवळून घ्यावे जेणे करून  गुठळ्या होणार नाहीत. नंतर दुधात केशर आणि पिठीसाखर मिसळा. हे मिश्रण घट्ट करून घ्या आणि ते तव्याला चिकटू नये. अशा प्रकारे खवा तयार होईल. 
 
यानंतर पनीरचे गोळे  कापून त्यात थोडा खवा भरा. नंतर पनीरचे गोळे सिरपमध्ये टाका. सेट झाल्यावर सर्व्हिंग प्लेटमध्ये घालून  सर्व्ह करा. या सोप्या पद्धतीने बंगाली मिठाई चमचम तयार होईल.
 




Edited by - Priya Dixit     
 
 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Oats Foot Scrub फक्त २० रुपयांच्या ओट्सने १० मिनिटांत पायांचा थकवा चुटकीसरशी होईल दूर

हिवाळ्यात बाजरी खाण्याची सवय लावा; वजन कमी होण्यापासून ते पचनक्रिया सुधारण्यापर्यंत मिळतील अनेक फायदे!

सर्व वयोगटातील महिलांसाठी ही ३ योगासने सर्वोत्तम; दररोज फक्त १० मिनिटे करा

रेशमी, लोकरी आणि काश्मिरी कपड्यांची काळजी घेण्यासाठी या सोप्या घरगुती टिप्स फॉलो करा!

तेनालीरामाची कहाणी : एक भाकरी, शंभर लढाया

पुढील लेख
Show comments