Daily Horoscope
✕

Diwali sweet Peanut katli Recipe दिवाळीसाठी बनवा शेंगदाणा कतली

Updated: बुधवार, 8 नोव्हेंबर 2023 (23:34 IST)
 
साहित्य- 
1 वाटी  शेंगदाणे
2 चमचे दूध पावडर
1 वाटी  साखर
1/2 पाणी
1-2चमचे साजूक तूप
 
कृती- 
शेंगदाणा कतली बनवण्यासाठी सर्वप्रथम  शेंगदाणे खरपूस भाजून घ्या. यासाठी गरम करण्यासाठी कढई ठेवा. कढईत शेंगदाणे हलके तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या . भाजल्यानंतर ताटात काढून चोळून  सर्व साले काढून टाका.
शेंगदाण्याची साले काढल्यानंतर ते सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून घ्या. बारीक झाल्यावर चाळणीतून पावडर गाळून एका मोठ्या भांड्यात ठेवा.आता शेंगदाणा पावडरमध्ये मिल्क पावडर घाला , चांगले मिसळा आणि बाजूला ठेवा.

गोडपणासाठी पाक तयार करा. कढईत एक वाटी साखर आणि अर्धा वाटी पाणी घाला. चंगळ उकळू द्या. पाक तयार झाल्यावर त्यात शेंगदाणे आणि मिल्क पावडर घाला, ते एका पॅनमध्ये ठेवा आणि ते घट्ट गोळा होई पर्यंत शिजवा. मिश्रण सतत ढवळत राहा आणि गोळा तयार झाल्यावर  कढई  गॅस वरून खाली काढून घ्या. मिश्रण चांगले मळून घ्या आणि एका ट्रेमध्ये तूप लावून हे मिश्रण लाटून घ्या.
लाटल्यानंतर चाकूच्या साहाय्याने कतलीच्या आकारात कापून घ्या दिवाळीसाठी खास शेंगदाणा कतली खाण्यासाठी तयार. 









Edited by - Priya Dixit  
 
 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments