Festival Posters

Marathi Essay on माझे आवडते शिक्षक

Updated: सोमवार, 16 फेब्रुवारी 2026 (22:26 IST)
आपल्या जीवनाला आकार देण्याचे आणि अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे काम 'शिक्षक' करतात. आई-वडील आपल्याला जन्म देतात, पण समाजात एक चांगली व्यक्ती म्हणून कसे जगावे, याचे शिक्षण आपल्याला शिक्षकांकडूनच मिळते. तसेच प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकांचे स्थान खूप महत्त्वाचे असते. शाळेत आपल्याला अनेक शिक्षक शिकवतात, पण त्यातील एखादे शिक्षक असे असतात जे आपल्या मनावर कायमची छाप पाडून जातात. माझ्या शालेय जीवनात अनेक शिक्षक आहे, परंतु माझे सर्वात आवडते शिक्षक श्री. आशुतोष वैद्य सर हे आहे.
 

व्यक्तिमत्व आणि स्वभाव

वैद्य सर आम्हाला 'मराठी' हे विषय शिकवतात. त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय साधे पण प्रभावी आहे. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एक प्रकारचे स्मितहास्य असते, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्याबद्दल भीतीऐवजी आदर निर्माण होतो. ते वेळेचे खूप पक्के आहे आणि आम्हालाही नेहमी शिस्तीचे महत्त्व पटवून देतात. तसेच  ते नेहमी साध्या वेशात असतात, पण त्यांचे विचार मात्र खूप उच्च आहे. त्यांच्या आवाजात एक प्रकारची माया आहे, ज्यामुळे वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला ते आपले वाटतात.
 

शिकवण्याची पद्धत

वैद्य सरांची शिकवण्याची पद्धत अतिशय छान आहे. वर्गात शिकवताना ते नवनवीन उदाहरणे देतात त्यांच्या तासाला कधीही कंटाळा येत नाही, उलट आम्ही त्यांच्या तासाची आतुरतेने वाट पाहतो. ते केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर विषयातील संकल्पना गोष्टींच्या माध्यमातून समजावून सांगतात.  
 

मार्गदर्शक आणि मित्र

त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते फक्त एक शिक्षक नसून आमचे उत्तम मित्र आणि मार्गदर्शक आहे. अभ्यासात काही अडचण असल्यास किंवा वैयक्तिक जीवनात काही ताण असल्यास, ते आम्हाला धीर देतात.  तसेच गरिब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ते नेहमी पुढे असतात.
 

निष्कर्ष

खरा शिक्षक तोच असतो जो विद्यार्थ्याला केवळ साक्षर करत नाही, तर त्याला एक चांगला माणूस बनवतो. शिक्षक हे राष्ट्राचे आधारस्तंभ असतात. वैद्य सरांनी मला संकटात जिद्दीने कसे उभे राहायचे हे शिकवले.वैद्य  सरांसारख्या शिक्षकांमुळेच मला अभ्यासाची गोडी लागली आणि माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. आयुष्याच्या वाटेवर चालताना त्यांनी दिलेली शिकवण मला नेहमीच मार्गदर्शक ठरेल. त्यांच्याबद्दल मला मनापासून आदर वाटतो आणि म्हणूनच ते माझे सर्वात आवडते शिक्षक आहे.
ALSO READ: मराठी निबंध पुस्तकाचे आत्मवृत्त
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: Essay on Corruption भ्रष्टाचार निबंध मराठी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments