Festival Posters
✕

FIFA World Cup 2022: कोरियाने उरुग्वेला बरोबरीत रोखले

Updated: शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2022 (15:10 IST)
 
कोरिया प्रजासत्ताकने फिफा विश्वचषकाच्या एच गटात उरुग्वेला गोलशून्य बरोबरीत रोखले. पूर्ण वेळ होऊनही दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले. 
उरुग्वेचा संघ आता २८ नोव्हेंबरला पोर्तुगालविरुद्ध खेळणार असून त्याच दिवशी कोरियाचा संघही घानाविरुद्ध खेळणार आहे. या विश्वचषकात उरुग्वेने आठवा सामना अनिर्णित ठेवला आहे. या स्पर्धेतील कोणत्याही संघाची ही तिसरी सर्वाधिक खेळी आहे. उरुग्वेपेक्षा फक्त इंग्लंड (11) आणि ब्राझील (9) यांनी जास्त अनिर्णित सामने खेळले आहेत. उरुग्वे संघाचे दोन शॉट गोलपोस्टला लागले. 1990 नंतर उरुग्वे संघासोबत असे पहिल्यांदाच घडले आहे.
 
दोन्ही संघांनी काही सोप्या संधी गमावल्या. आकडेवारी पाहता उरुग्वेने सामन्यादरम्यान गोलवर 10 शॉट्स मारण्याचा प्रयत्न केला. यापैकी फक्त एक शॉट लक्ष्यावर होता. मात्र, संघाला एकही गोल करता आला नाही. त्याचवेळी कोरियाने सात शॉट्स मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, संघाचा एकही फटका लक्ष्यावर राहू शकला नाही. उरुग्वेचा चेंडूवर ताबा 56 टक्के आणि कोरियाचा 44 टक्के होता. दोन्ही संघातील एका खेळाडूला पिवळे कार्ड मिळाले. उरुग्वेच्या मार्टिन कॅसेरेस आणि कोरियाच्या चो गे सुंग यांना यलो  कार्ड मिळाले.

Edited By - Priya Dixit
 

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर पूर्णविराम? दोन्ही गट एकत्र येणार नाहीत; नसीम सिद्दीकी यांचे स्पष्ट वक्तव्य

LIVE: अन्न व औषध प्रशासनाने नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले.

नालासोपारा परिसरात इमारतीच्या २० व्या मजल्यावर आग, वाहनांचे नुकसान, ३ जण जखमी

महाराष्ट्रातील राजकीय खळबळ वाढली; शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

एफडीएचा मोठा कारवाईचा बडगा! नाशिक विभागातील ५ जिल्ह्यांमधील १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

पुढील लेख
Show comments