- मनोरंजन
» - बॉलीवूड
» - आगामी चित्रपट
९९
निर्माता : अनुपम मित्तल, आदित्य शास्त्री दिग्दर्शक : राज निदिमोरू, कृष्णा डीके गीतकार : वैभव मोदी संगीतकार : शमीर टंडनकलाकार : कुणाल खेमू, सोहा अली खान, बोमन ईरानी, सिमोन सिंह, महेश मांजरेकर, विनोद खन्ना९९ च्या फेर्यात आपल्या सचिन तेंडुलकरसह अनेक जण अडकतात. १०० हा आकडा गाठण्यासाठी धडपड सारखी सुरू असते. तरीही अनेकदा ९९ मध्येच अडकून जायला होतं. ९९ हा चित्रपटही अशाच ९९ च्या फेर्यात अडकलेल्यांविषयी भाष्य करतो. चित्रपटाचा काळही १९९९ हाच आहे. सर्व पात्रे ९९ च्या फेर्यात अडकलेली आहेत. यात प्रणय आणि विनोदाच्या मसाल्याला वेगवान गती आणि चमकोगिरीचा तडका दिला आहे. पात्रपरिचय
सचिन (कुणाल खेमू) - सचिनकडे कल्पनांची कमी नाही. पण त्या त्याला अमलात आणता येत नाहीत. त्याला कुणीही मदत करत नाही.