Biodata Maker marathi
✕

'ओए लकी, लकी ओए'

Updated: मंगळवार, 16 डिसेंबर 2008 (14:05 IST)
निर्माता - रॉनी स्क्रूवाला
दिग्दर्शक - दिबाकर बॅनर्जी
संगीत - स्नेहा खानवलकर
कलाकार - अभय देओल, नीतू चन्द्रा, परेश रावल, अर्चना पूरनसिंह

' खोसला का घोसला' सारखे चित्रपट देऊन कायम चर्चेत रहाणारे दिबाकर बैनर्जी यांचा 'ओए लकी, लकी ओए' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. पुन्हा एकदा त्यांनी आपल्या चित्रपटात दिल्ली दाखविली आहे. आणि सेट उभा न करता त्यांनी दिल्लीत विविध ठिकाणी शूटींग केले आहे.

दिल्लीवर त्यांचे विशेष प्रेम आहे. ते म्हणतात, मी बंगाली आहे पण, मला पंजाबी असल्याची समजूत आहे कारण पंजाबी संस्कृती मी जवळून जाणतो. ओए लकी, लकी ओए ची कथा देवेद्र उर्फ बंटी नावाच्या चोरावर आधारीत आहे. तो दिल्लीच्या सेंट्रल जेलमध्ये कैद आहे. या चित्रपटात अभय देओल यांनी लकी नामक चोराची भूमिका केली आहे. लकीच्या चालाखीला दिल्ली पोलिससुध्दा दाद देतात. तो इतक्या सफाईने चोरी करतो की, सुरक्षा करणारे लोकही अचंबीत होतात.

लकीला जी वस्तु आवडते ती तो चोरतो. भलेही त्यासाठी कितीही धोका पत्करण्याची त्याची तयारी असते. दिल्लीत रहाणा-या श्रीमंत लोकांच्या घरी तो चोरी करतो. त्याच्याकडे सगळ्या सुख-सुविधा आहेत. पण, त्याला समाजात सन्मानाने जगायचे असते. 'ओए लकी, लकी ओए' मध्ये लकी चोराची ही कथा व्यंग्यात्मक पध्दतीने दाखविण्यात आली आहे.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले

नवाझुद्दीन सिद्दिकी आणि दिया मिर्झा यांची प्रमुख भूमिका असलेला 'डॉ. हसन' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

श्रद्धा कपूरच्या 'ईठा' ने प्रदर्शनापूर्वीच इतिहास रचला! चित्रपटाने 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये स्थान मिळवले; प्रमाणपत्र देऊन सन्मान

ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपट 'गोंधळ'; १०४ पात्र चित्रपटांच्या यादीत समावेश

Miss Universe: ११५ स्पर्धकांवर मात करीत जेनिफर बॅरेटोने मिस युनिव्हर्स २०२६ चा मुकुट जिंकला

सर्व पहा

मराठी चित्रपट "तू आहेस ना" IFFI 2026 मध्ये प्रदर्शित, सुप्रिया पिळगावकर आणि सिद्धार्थ बोडके यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली!

सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले ''मेळघाट अभयारण्य'' अमरावती Melghat Tiger Reserve

Kumar Sanu Guinness World Record कुमार सानू यांनी एका दिवसात २८ गाणी कशी रेकॉर्ड केली सांगितले

बंगाली अभिनेत्री मिमी चक्रवर्तीने गुपचूप लग्न केले, विवाहाचे सुंदर फोटो समोर आले

Maha Ganapati Temple Wai कृष्णा नदीच्या काठावर वसलेले जागृत 'ढोल्या गणपती मंदिर'

Show comments