Dharma Sangrah

अगली और पगली

Updated: शुक्रवार, 25 जुलै 2008 (14:24 IST)
निर्माता : रंगिता प्रीतिश नंदी - प्रीतीश नंदी
दिग्दर्शक : सचिन कमलाकर खो ट
कथा-पटकथा : अनिल पांडे
गीतकार : अमिताभ वर्म ा
संगीत : अनु मलि क
कलाकार : मल्लिका शेरावत, रणवीर शौरी, टीनू आनंद, सुष्मिता मुखर्जी, मनीष आनंद, विहांग नायक, भारती आचरेकर.

' अगली और पगली' चा नायक कबीर अतिशय 'मनमौजी' तरूण आहे. इंजिनियरींगला असणारा कबीर दहा वर्षापासून तेच करतोय. पण त्याच्या जीवनात 'कुहू' येते आणि सगळे काही बदलून जाते.

कबीर तिच्या मागे लागतो. पण कुहू काही त्याला दाद देत नाही. त्याला ती हरप्रकारे त्रास देते. त्याला अर्धनग्न अवस्थे ती पळायला भाग पाडते. विना सीटची सायकल चालवायला लावते. एवढेच नाही तर महिलांचे हायहिल्सचे शूज घालून चालायलाही लावते. या दोघांमधल्या गमती जमती म्हणजे 'अगली और पगली' आहे.

पात्र परिचय

IFMIFM
' कुहू' उर्फ पगली (मल्लिका शेरावत)
' कुहू' उर्फ पगली म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर 'कठिण' किंवा 'अशक्य' मुलगी आहे. ती काय करेल खुद्द तिलाही सांगता यायचे नाही. तिच्या व्यकिगत जीवनात खूप अडचणी आहेत. त्यामुळे आपल्या जीवनात आलेल्या व्यक्तिला त्या जाणवायला हव्यात हा तिचा अट्टाहास आहे. म्हणूनच ती अशा एका तरूणाच्या शोधात आहे, जो आपल्या प्रेमात पडेल, पण त्याच्या आयुष्यात वादळ निर्माण करण्याची तिची इच्छा आहे. पगलीच्या आत खोडकरपणाही दडला आहे. तो कधी बाहेर येईल सांगता यायचे नाही. त्यावेळी समोरच्याची पळता भुई थोडी होते. एवढे मात्र नक्की.

कबीर उर्फ अगली (रणवीर शौरी)
IFMIFM
कबीर अत्यंत बोअर माणूस आहे. इंजिनियरींगच्या पाट्या तो दहा वर्षे टाकत बसला आहे. आपल्याला एखादी गर्लफ्रेंड असावी ही त्याची 'तमन्ना' आहे. थंडीच्या दिवसात मुंबईच्या सीएसटी स्टेशनवर त्याची भेट पगलीशी होते. तिच्या संपर्कात आल्यानंतर त्याला कधी विचारही केला नसेल अशी कामे करावी लागतात. अखेर तो तिच्यापासून स्वतःची सुटका करू इच्छितो. पण ते करता करता तो तिच्या प्रेमात पडतो. अशा अवस्थेत पुढे काय होते? त्यासाठी पहा 'अगली और पगली'.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

72nd National Film Awards: 'आर्टिकल ३७०' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा, तर कार्तिक आर्यन आणि ममूटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला

कार्तिक आर्यनला त्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला; कुटुंबासोबत विजयाचा आनंद साजरा केला

रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर लीक, यशचा रावणाचा अवतारही दिसला

जान्हवी कपूरला एक नवीन चित्रपट मिळाला, या दिग्दर्शकासोबत काम करणार

सनी देओलच्या 'पार्टिशन १९४७' चा टीझर प्रदर्शित; फाळणीची हृदयद्रावक कथा अंगावर काटा आणेल

बिग बॉस २० ची घोषणा, सलमान खान पुन्हा एकदा सूत्रसंचालन करणार

हिमाचल प्रदेशच्या खोऱ्यांमध्ये वसलेले जिभी, पर्यटकांची पहिली पसंती बनले

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी: बॉलिवूडच्या कलाकारांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला

83 वर्षीय अमिताभ बच्चन यांच्यावर शस्त्रक्रिया झाली? ICU मध्ये दाखल, बिग बींच्या प्रकृतीबाबत समोर आली महत्त्वाची माहिती

राजस्थान रॉयल्सच्या वादाप्रकरणी इंग्लंड न्यायालयाने राज कुंद्राला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले

Show comments