suvichar
✕

अब्बास मस्तान जोडीचा नकाब

Updated: बुधवार, 20 जून 2007 (15:14 IST)

निर्माता : कुमार एस तौरानी, रमेश एस तौरानी
दिग्दर्शक : अब्बास मस्तान
संगीत : प्रीतम चक्रवती
कलाकार : बॉबी देवल, अक्षय खन्ना, उर्वशी शर्मा

रहस्यमय चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेली दिग्दर्शक द्वयी अब्बास मस्तान आता 'नकाब' चित्रपट घेऊन येत आहे. याअगोदर त्यांनी अक्षय व बॉबी देवल यांची भूमिका असलेला 'हमराज' चित्रपट दिग्दर्शित केला होता. तो चांगलाच गाजला. रहस्याभोवती गुंफलेली कथा, वेगवान हाताळणी आणि त्याला हीट गाण्यांची फोडणी हा या द्वयीचा फॉर्म्युला आतापर्यंत यशस्वी ठरला आहे. त्यामुळे कलाकार त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असतात.

' नकाब' चित्रपटाचे कथानक सोफी (उर्वशी शर्मा), करण खन्ना (बॉबी देवल) व विकी मल्होत्रा (अक्षय खन्ना) या तीन पात्रांभोवती गुंफण्यात आले आहे. या पात्रांची स्वप्न, इच्छा, आकांक्षा भिन्न आहेत. आर्थिक, सामाजिक पार्श्वभूमीसोबतच आव्हानेही भिन्न आहेत. सोफी मध्यमवर्गीय मुलगी, तर करण खन्ना गर्भश्रीमंत.
IFM
दोन धृवाची दोन टोके बांधली आहेत 'लिव इन रिलेशनशिप'च्या नात्याने. परंतु, सोफीचा खर्‍या प्रेमाचा शोध अजूनही संपला नाही. बहुतेकदा सहवास व प्रेम यांच्यात गल्लत होण्याची शक्यता असते. आपले प्रेम आहे की फक्त सहवास? या द्विधा मनस्थितीत असणार्‍या सोफीची गाठ अनपेक्षितपणे विकी मल्होत्राशी पडते. विकी हा तरूण स्वप्नपूर्तीसाठी संघर्ष करतोय. त्याला यशस्वी नट व्हायचंय.

IFM
आयुष्याच्या वळणावर विकीशी गाठ पडल्यावर उर्वशीचा शोध संपतो. खरं प्रेम काय असते? याचा उलगडा तिला होतो. उर्वशी नकळत विकीकडे आकर्षित होते. कथानकाच्या या टप्प्यावर तिन्ही पात्रांच्या पूर्वायुष्यातील रहस्य सामोरे यायला सुरवात होऊन उत्कंठतेत भर पडते. करण की विकी? उर्वशीला नेमके कोण हवे आहे ? तिघांच्याही पूर्वायुष्यात दडलंय काय? या प्रश्नांच्या उत्तरासाठी अर्थातच चित्रपटापुढचा 'नकाब' (पडदा) दूर करावा लागेल.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले

नवाझुद्दीन सिद्दिकी आणि दिया मिर्झा यांची प्रमुख भूमिका असलेला 'डॉ. हसन' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

श्रद्धा कपूरच्या 'ईठा' ने प्रदर्शनापूर्वीच इतिहास रचला! चित्रपटाने 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये स्थान मिळवले; प्रमाणपत्र देऊन सन्मान

ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपट 'गोंधळ'; १०४ पात्र चित्रपटांच्या यादीत समावेश

Miss Universe: ११५ स्पर्धकांवर मात करीत जेनिफर बॅरेटोने मिस युनिव्हर्स २०२६ चा मुकुट जिंकला

सर्व पहा

आर्यन खानच्या रूमर्ड गर्लफ्रेंडचे खान परिवाराशी नाते कसे? लारिसा बोनेसीने सांगितल्या पडद्यामागच्या गोष्टी

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले

नवाझुद्दीन सिद्दिकी आणि दिया मिर्झा यांची प्रमुख भूमिका असलेला 'डॉ. हसन' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

रामायणाने इतिहास रचला! २७ देशांमध्ये नंबर १ भारतीय चित्रपट बनत १७७७ कोटींचा टप्पा ओलांडला

बिहारी महिला आणि छठ-सिंदूरवर टिप्पणी केल्याप्रकरणी कॉमेडियनविरोधात एफआयआर दाखल