Biodata Maker marathi
✕

दिवाळीत खमंग चित्रपटांचा 'फराळ'

Published: मंगळवार, 16 डिसेंबर 2008 (14:11 IST)
बाजारात दिवाळीची धामधूम सुरू झाली असतानाच बॉलीवूडलाही या मुहूर्ताचे वेध लागले आहेत. दिवाळीत आपले चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी निर्मात्यांची एकच धांदल सुरू आहे. सुट्यांमध्ये चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळतो म्हणून अनेक चित्रपट 'वेटिंग' मध्ये होते. आता पुढील आठवड्यात बिगबजेट चित्रपट प्रदर्शित होत आहेत.

IFMIFM
मंगळवारी दिवाळीस सुरुवात होत आहे आणि बुधवारी दोन प्रमुख चित्रपट प्रदर्शित होत आहेत. 'गोलमाल' च्या यशानंतर दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचा त्याच धर्तीवरचा 'गोलमाल रिटर्न' प्रदर्शित होत आहे. पहिल्या चित्रपटात प्रेक्षकांना पोट धरून हसवायला लावल्यानंतर दुसरा चित्रपटही तेवढाच कॉमेडी ठरेल, असा त्यांना विश्वास आहे.

IFMIFM
यामध्ये अजय देवगण, करीना कपूर, सेलिना जेटली, श्रेयस तळपदे, अमृता अरोरा सारखे आघाडीचे कलाकार आहेत. सणासुदीच्या दिवसात लोकांना हलके-फुलके कॉमेडी चित्रपट बघायला आवडतात, त्यामुळे या चित्रपटाला प्रतिसाद मिळेल असा निर्माते ढिलीन मेहता यांना विश्वास आहे.

गेल्या काही महिन्यांपासून हवा होत असलेला मधुर भांडारकर यांचा 'फॅशन' हा चित्रपटही याचदिवशी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि कंगना रानावतबरोबर मुग्धा गोडसे हा नवा मॉडेलिंगमधला चेहरा दिसणार आहे. मधुर भांडारकर यांनी या चित्रपटाचा जोरदार प्रचार केला आहे. मोठा गाजावाजा होऊन प्रदर्शित होणारा त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.

IFMIFM
' हीरोज़' आणि 'रोडसाइड रोमियो' हे चित्रपट देखील दिवाळी संपताच प्रदर्शित होणार आहेत. कमर्शिअल दृष्टिकोनातून हे चित्रपट मागे आहेत. या चित्रपटांमध्ये दम असेल तर त्यावेळेला इतर चित्रपट नसल्याने हे चित्रपट चालू शकतील. 'हीरोज़' मध्ये सलमान, सनी, बॉबी, प्रीती झिंटा सारखे कलाकार आहेत. समीर कर्णिक यांनी दिग्दर्शक केले आहे.

दिवाळीत यशराज फिल्म्सने प्रदर्शित केलेले चित्रपट हिट झाले आहेत. यावेळेला त्यांचा 'रोडसाइड रोमियो' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. डिज्नी स्टुडियोच्या मदतीने त्यांनी हा चित्रपट केला आहे. तांत्रिकदृष्ट्या सक्षम असणारा हा चित्रपट एनिमेटेड आहे. मात्र, प्रेक्षक पैसे खर्च करून एनिमेशन चित्रपट बघतील का? हा प्रश्न आहे.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले

नवाझुद्दीन सिद्दिकी आणि दिया मिर्झा यांची प्रमुख भूमिका असलेला 'डॉ. हसन' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

श्रद्धा कपूरच्या 'ईठा' ने प्रदर्शनापूर्वीच इतिहास रचला! चित्रपटाने 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये स्थान मिळवले; प्रमाणपत्र देऊन सन्मान

ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपट 'गोंधळ'; १०४ पात्र चित्रपटांच्या यादीत समावेश

Miss Universe: ११५ स्पर्धकांवर मात करीत जेनिफर बॅरेटोने मिस युनिव्हर्स २०२६ चा मुकुट जिंकला

Kumar Sanu Guinness World Record कुमार सानू यांनी एका दिवसात २८ गाणी कशी रेकॉर्ड केली सांगितले

बंगाली अभिनेत्री मिमी चक्रवर्तीने गुपचूप लग्न केले, विवाहाचे सुंदर फोटो समोर आले

Maha Ganapati Temple Wai कृष्णा नदीच्या काठावर वसलेले जागृत 'ढोल्या गणपती मंदिर'

आर्यन खानच्या रूमर्ड गर्लफ्रेंडचे खान परिवाराशी नाते कसे? लारिसा बोनेसीने सांगितल्या पडद्यामागच्या गोष्टी

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले

Show comments