Dharma Sangrah
✕

देशद्रोही : 'हॉं मै भैय्या हू'

Updated: मंगळवार, 16 डिसेंबर 2008 (14:09 IST)
निर्माता : कमाल रशीद खान
दिग्दर्शक : जगदीश शर्मा
संगीत : निखिल, प्रमोद नायर
कलाकार : ग्रेसी सिंह, रवि किशन, मनोज तिवारी, हृषिता भट्ट, मुकेश तिवारी, यशपाल शर्मा, निर्मल पांडे, रंजीत, रजा मुराद, शक्ति कपूर, कादर खान, प्रेम चोप्रा, किम शर्मा, कमल रशीद खान

राज ठाकरे यांनी मराठी मुद्दा उचलून धरत सुरू केलेल्या आंदोलनामुळे प्रांतीक आणि राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याचे पडसाद बॉलीवुडमध्येही उमटत आहेत. 'हा मै भैया हू.. और हम नही डरेंगे' असे रोखठोक संवाद असणारा ' देशद्रोही हा चि‍त्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. सध्या सुरू असणा-या वादाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने या चित्रपटावरून तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, केवळ भडक संवादामुळे चित्रपटाची हवा केली जात असून या चित्रपटात मराठी अस्मितेला धक्ता पोहोचेल असे काहीच नाही. असे म्हटले जात आहे. तर मग या चि‍त्रपटाचे कथानक नेमके काय आहे. याचा थोडक्यात आढावा घेऊ...

उत्तर भारतातील एका गावात शेती करणारा 'राजा' परिस्थितीला वैतागला आहे. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो मुंबईत येतो. त्याचा मित्र शेखर मुंबईत वॉचमनची नोकरी करत असतो. तो राजालाही वॉचमची नोकरी करण्याचा सल्ला देतो. पण, राजाला ही नोकरी पसंत नसते. सोनिया नावाच्या मुलीशी त्याची ओळख होते. ड्रग्जचा व्यवसाय करणा-या बाबा कदमसाठी काम करण्यास ती त्याला भाग पाडते.

उत्तर भारतीय असल्याने मुंबईत रहाताना राजाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. उत्तर भारतीयांचा नेता असणा-या श्रीवास्तवला राजा आपला आदर्श मानत असतो. पण, तो दुस-या नेत्यांसारखाच भ्रष्ट आणि स्वार्थी असतो.

IFM
सामान्य जनतेच्या भावनांशी खेळणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीही चित्रपटात दाखविण्यात आले आहेत. माध्यमांचे प्रतिनिधी बातम्यांचा भडीमार करून त्यांचे पितळ उघडे करतात.

बाबासाठी काम करत असल्याने सोनियावर राजनची वक्रदृष्टी असते. राजन नायक हा देखील ड्रग डिलर असतो आणि त्याचे राजकारण्यांशी जवळचे सबंध असतात. एक दिवस राजनच्या माणसाची सोनिया रस्त्यावरच धुलाई करते. याचा बदला घेण्यासाठी राजन आपल्या भावाला पाठवतो. यावेळी सोनियाला वाचविण्‍यासाठी राजा धावून येतो आणि त्याच्या हातून राजन नायकच्या भावाचा खून होतो. राजनचे डोके फिरते आणि तो सोनिया आणि राजाला मारण्याची सुपारी राजेश शर्मा नावाच्या इन्सपेक्टरला देतो.

राजा आणि सोनियाच्या मागे पोलिस आणि माफियाचे लोक लागतात. सोनियाच्या काकूकडे ते दोन दिवस लपून रहातात. या परिस्थितीचा फायदा घेण्‍याच्या उद्देशाने बाबा कदम डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न करतो. श्रीवास्तवसुध्दा दोघांची मदत करण्‍याचे नाटक करतो. हा सगळा घटनाक्रम न्यूज चॅनलसाठी ‘हॉट केक’ बनतो. युवा इन्स्पेक्टर रोहित राघव राजाला पकडण्याची शपथ घेतो.

सगळे राजकारणच भ्रष्ट असल्याचे राजाला कळून चुकते. तो कायदा हातात घेऊन खलनायकांची हत्या सुरू करतो. मारेकरी कोण आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न मिडीयाकडून केला जातो. अखेर राजा श्रीवास्तवलाच ठार मारतो. हा घटनाक्रम मीडिया कव्हर करते आणि बातम्यांचा भडीमार सुरू करतात. शेवटी सोनियाला घेऊन राजा आपल्या गावात परततो.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपट 'गोंधळ'; १०४ पात्र चित्रपटांच्या यादीत समावेश

Miss Universe: ११५ स्पर्धकांवर मात करीत जेनिफर बॅरेटोने मिस युनिव्हर्स २०२६ चा मुकुट जिंकला

इंस्टाग्रामवर ‘झुमका पटोला’च्या 10 लाख रील्सचा टप्पा पार; शर्वरी म्हणाली....

'जपनाम' पुन्हा एकदा गाजणार, बॉबी देओलच्या 'आश्रम ४' चे शूटिंग पूर्ण

कान्हेरी लेणी : मुंबईतील प्राचीन बौद्ध संस्कृतीचा अनमोल वारसा

Show comments