PR |
आमिर खानला जेव्हा त्याची पत्नी किरण रावने सांगितले की तिने एक कथा तयार केली आहे, तर आमिर एकदम घाबरला कारण त्याला असे वाटत होते की जर स्क्रिप्ट खराब आहे असे म्हटले तर त्याचा प्रभाव किरण आणि त्याच्या वैवाहिक संबंधांवर नक्कीच पडेल. त्याने किरणाला सांगितले की तो कुनूर जाऊन मंसूर खान सोबत स्क्रिप्ट ऐकणे पसंत करेल. जेव्हा किरणने मंसूर आणि आमिरला स्क्रिप्ट ऐकवली तर दोघेही आश्चर्यचकित झाले, आणि आमिरने लगेचच चित्रपटाचा निर्माता बनण्यास आपली सहमती दिली.
PR |
मुंबई शहर आपल्यात एक अनोखे आहे. येथे हजारो लोक स्वप्न घेऊन येतात. या शहरावर बरेच चित्रपट तयार झाले आहे. तसेच किरणच्या चित्रपटात मुंबईबद्दल बरेच काही आहे. चित्रपटाची कथा आहे शहरात राहणाऱ्या चार लोकांची, जे वेग वेगळे पार्श्वभूमीहून आलेले आहे. हे चारीजण एकमेकांशी आपसात भेटतात आणि त्यामुळे त्यांचे जीवन एकदम बदलतं.
PR |
मुंबईत पावसाच्या झडीत टॅक्सीच्या आतून एक व्हिडिओ कॅमेरेच्या माध्यमाने शहराला शूट करण्यात येत असते. कॅमेरेच्या मागे आहे एक लाजाळू मुलगी यास्मीन (कीर्ती मल्होत्रा) असते. टॅक्सी ड्रायव्हरशी जेव्हा ती बोलणे सुरू करते तेव्हा तिला हे समजते की ते दोघेही उत्तर प्रदेशातील आहे आणि दोघांचे शहर एकदमच जवळचे आहे. यामुळे दोघांमध्ये आत्मीयता निर्माण होते.
शाई (मोनिका डोगरा) मुंबईत एका बँकेत काम करत असते. तिची भेट अरुण (आमिर खान)शी होते जो एक पेंटर आहे. अरुण आणि शाई एक रात्र सोबत काढतात. या घटनेबाबत अरुण काहीच बोलायला तयार नसतो आणि शाई या घटनेला विसरायला तयार नसते. पुढच्या दिवशी दोघेही आता जीवनात कधी भेटणार नाही म्हणून आपापल्या मार्गाला लागतात.
PR |
मुन्ना (प्रतीक) धोबी आहे, जो शाईकडे कपडे घ्यायला येतो. मुन्नाला फिल्म अभिनेता बनायचे असते. त्याला जेव्हा हे कळत की शाईला फोटोग्राफीची आवड आहे तर तो तिला एकाच अटीवर ‘रियल’ मुंबई दाखवण्यासाठी घेऊन जातो की ती त्याचा पोर्टफोलियो तयार करून देईल. शाईच्या सहवासात राहिल्यामुळे तो लगेचच तिला प्रेम करू लागतो.
अरुण एका नव्या अपार्टमेंटमध्ये राहायला जातो जेथे त्याला शांतिपूर्वक जीवन जगायचे असते. पण तेथे त्याच्या समोर एका रहस्य असते जे उघडकीस येते आणि जे सरळ त्याच्या मनाला लागते. ह्या सर्व गोष्टींमुळे तो मुंबईला एका नवीन नजरेने बघतो.
PR |
दिग्दर्शकाबद्दल : दिग्दर्शक म्हणून किरण रावचे हे पहिले चित्रपट आहे आणि तिला आपली स्वतंत्र ओखळ बनवायची आहे. मुंबई शहरात भाडेकरूच्या रूपात किरण बऱ्याच अपार्टमेंटमध्ये राहिलेली आहे आणि त्यातूनच तिला ‘धोबी घाट’ लिहिण्याची प्रेरणा मिळाली. किरणचे मत आहे की तिने हे चित्रपट मुंबई आणि तेथे राहणारे लोक, जे ट्रेनमध्ये आहे, नावेत आहे, ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहे, बिल्डिंग बनवण्यात मग्न आहे, सागर किनाऱ्यावर बसलेले आहे आणि उद्याचे स्वप्न बघत आहे, त्यांच्यासाठी हे चित्रपट तयार केले आहे.