Dharma Sangrah

निखळ मनोरंजनाची 'धमाल'

वेबदुनिया
IFMIFM

निर्माता : अशोक ठाकरिया, इंद्र कुमार
दिग्दर्शक : इंद्र कुमार
गीतकार : समीर
संगीत: अदनान सामी
कलाकार : संजय दत्त, जावेद जाफरी, अरशद वारसी, रितेश देशमुख, आशीष चौधरी


दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी दिल, बेटा, इश्क, मस्ती सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आगामी 'धमाल' चित्रपटातून मस्ती, मनोरंजन व विनोदाची धमाल उडवणार आहेत. ही कथा आहे चार मित्रांची. चारही नमुने. मानव श्रीवास्तव ( जावेद जाफरी) या पात्रास महामूर्ख म्हटल्यास वावगे ठरणार नाही, मात्र आपण मूर्ख असल्याचे त्याच्या ध्यानीमनीही नाही.

माधवचा मोठा भाऊ आदित्य श्रीवास्तव हाही ( अरशद वारसी ) नमुनाच आहे. तसे त्यास जगभरातले ज्ञान आहे, मात्र अर्धवट. अर्धवट ज्ञान असणे ज्ञान नसण्यापेक्षाही घातक असते. मात्र येथे सगळेच उलटे. चौघांच्या टोळक्यात तो सर्वात बुद्धीमान म्हणून मिरवत असतो. देशबंधू रॉय ऊर्फ रॉय ( रितेश देशमुख ) नमुन्यातील नमुना आहे.

दुनियेत आपल्यासारखा जासूस कोणी नसल्याच्या भ्रमात तो वावरत असतो. टोळक्यातला चौथा सदस्य आहे बोमन कॉंट्रक्टर (आशीष चौधरी). मिस्टर बोमनपेक्षा त्यास मिस्टर डरपोक म्हटले असते तर अधिक संयुक्तिक वाटेल. आपले वडील नारी कॉंट्रॅक्टर (असरानी) यांना तो सर्वात अधिक घाबरतो. चौघेही सोबतच राहतात व सोबतच काम करतात.

ईमानदारी या शब्दाशी यांचे एकदम वाकडे. क्लुप्त्या लढवून अधिक पैसे कमावण्यासाठी ते धडपडत असतात. त्यांचे नशीब साथ देते व त्यांना श्रीमंत बनण्याची संधी मिळते. शेवटच्या घटका मोजत असलेल्या बोस (प्रेम चोपडा ) सोबत त्यांची गाठ पडते. त्याला वाचविण्याचे त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरतात. मात्र, जगाचा निरोप घेण्याअगोदर त्याने गुप्तपणे साठवलेल्या करोडो रूपयांची माहिती देऊन जातो. चौघांनाही अत्यानंद होतो. त्यांना अमाप संपत्ती व ऐशोरामी जीवनाचे स्वप्न पडायला लागतात.

मात्र कबीर नायकच्या (संजय दत्त) रूपाने त्यांच्या मार्गात अडचण उभी राहते. इंसपॅक्टर कबीर दहा वर्षापासन बोसच्या पाळतीवर असतो. शोधात तो बोसच्या मृतदेहापर्यंत पोहचतो. चौघांना बघून बोसच्या मृत्यूविषयी तो चौकशी करतो. चौघेही कबीरची नजर चुकवून पळ काढतात. येथून लपाछपीचा खेळ सुरू होतो. पाठशिवणीच्या या खेळात ते अनेक हास्यास्पद परिस्थितीत सापडतात.

पडद्यावर हे नाट्य बघताना प्रेक्षकांना हसे आवरणार नाही, एवढे नक्की. बोसने खरोखरच धन साठवून ठेवले होते? कबीर नायक चौघा नमुन्यांना पकडण्यात यशस्वी होतो काय? सर्व प्रश्नांचा उत्तरासाठी चित्रपटच बघावा लागेल.







सर्व पहा

कॉकटेल २ चित्रपट समीक्षा: सुंदर वेष्टनात सादर केलेली एक कमकुवत प्रेमकथा

साधेपणाचे एक उदाहरण: सुनील ग्रोव्हर ऋषिकेशमध्ये फूटपाथवर चादर पसरून झोपले

'देऊळ बंद २' या मराठी चित्रपटाचे ४२ लाख रुपयांचे बिल शाहरुख खानने माफ केले; चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला

3 इडियट्स'च्या सिक्वेलबद्दल मोठी बातमी, राजकुमार हिरानी यांनी कथेचे गुपित उघड केले

'वेलकम टू द जंगल'मध्ये नवीन गाणे प्रदर्शित, अमृता फडणवीस यांच्या आवाजाने 'दिवाने हैं' हा सुपरहिट ट्रॅक झाला

सर्व पहा

Ramayana Scene Leaked रणबीरच्या 'रामायण'मधील ११ सेकंदांची क्लिप लीक! यूजर्स नाराज

आशुतोष राणा यांनी भक्तांना महत्त्वपूर्ण भेट दिली; आता घरबसल्या १०० मंदिरांचे दर्शन घडणार

भूतानमधील हे सुंदर शहर भारताच्या इतके जवळ की व्हिसा किंवा पासपोर्टशिवाय प्रवास करता येतो

कंगना रणौत 'लॉक अप २' मध्ये लोकांचा आवाज म्हणून शोमध्ये प्रवेश करणार

Subodh Bhave in Queen 2 सुबोध भावे 'Queen 2' मध्ये कंगना रणौतच्या पतीच्या भूमिकेत

Show comments