दिग्दर्शक : सिध्दार्थ आनंद कलाका र : रणवीर कपूर, मिनिषा लांबा, बिपाशा बसू, दीपिका पदुकोण
' प्रेम' हे व्यक्तीला नवीन परिस्थितीची जाणीव करून त्यातून त्याला नवा धडा शिकवून जाते. 'बचना ऐ हसीनो' या चित्रपटाचे कथानकही प्रेमावरच आधारीत आहे. त्यात 'एक फूल दो माली' नाही, तर 'एक माळी व चक्क तीन फुले' दाखविली आहेत.
राज (रणवीर कपूर ) या तरूणाच्या आयुष्यात तीन मुली विविध रंग भरतात. मात्र तरीही त्याचे जीवन 'खिचडी' होत नाही. उलट प्रत्येक मुलीकडून तो काही ना काही शिकत असतो. म्हणजे एका चित्रपटात तीन 'लव्ह स्टोरी' प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. राज व माही (मिनिषा लांबा), राज व राधिका (बिपाशा बसू ), राज व गायत्री (दीपिका पदुकोण) असा प्रेमाचा त्रिकोण आहे.
IFM
राज हा चांगला वर्तवणूक असलेला तरूण दाखविला असून तो रूपवान आहे. त्याचे एकूण आदर्श व्यक्तिमत्व पाहून चांगल्या चांगल्या तरूणी त्याच्यावर लट्टू होतात. तरूणींमध्ये त्याच्याशी बोलण्यासाठी स्पर्धा सुरू असते. त्यात माही नावाची अगदी साधी भोळी मुलगी आहे. तिला वाटतं जे तिच्या आजूबाजूला आहे हेच जग आहे. त्याने तिच्या इच्छा देखील काही जास्त नसतात. ती या विचारात असते की, तिने जी इच्छा केली ते तिला मिळाले पाहिजे.
याउलट राधिका नावाचे 'कॅरेक्टर' आहे. बिपाशा म्हणजे 'गरम मसालाच 'असं प्रेक्षकांनी गृहित धरले आहे. आणि तसेच तिचे या चित्रपटातील व्यक्तिमत्व आहे. राधिका मुंबईत एका फ्लॅटमध्ये एकटीच राहते व सुप्रसिध्द डान्स प्रशिक्षक श्यामक दावरसोबत डान्स करते. चित्रपटांमध्ये काम करण्याचे तिचे स्वप्न आहे व ती त्यात कधीही तडजोड करणार नाही इतकी ती निश्चियी व बिनधास्त स्वभावाची मुलगी आहे. इच्छा पूर्ण करण्याची तिची जिद्द व त्यात जर तिचा बॉयफ्रेंड जरी येत असेल तर त्याला सोडण्याची तिची धमक आहे.
IFM
गायत्री (दीपिका पदुकोण) या भूमिकेबाबतीत मात्र दिग्दर्शकाने मौन पाळले आहे. त्यामुळे गायत्रीचे व्यक्तिमत्व कसे आहे हे 'बचना ऐ हसीनो'हा चित्रपट पाहिल्यानंतरच कळणार आहे.
यशराज बॅनर सारख्या ख्यातनाम चित्रपट निर्मिती कंपनीच्या या चित्रपटाला दिग्दर्शित केले आहे सिध्दार्थ आनंद यांनी. याआधी त्यांनी 'सलाम-नमस्ते' आणि 'तारा रम पम' हे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
Read More