suvichar
✕

बहुचर्चित 'सरकार राज'

Updated: गुरूवार, 29 मे 2008 (12:04 IST)
IFMIFM
' सरकार' बनविणारा रामगोपाल वर्मा आता 'सरकार राज' घेऊन येत आहेत. या चित्रपटाविषयी खूप उत्सुकता आहे. कारण बच्चन कुटुंबिय या चित्रपटाद्वारे एकत्र पडद्यावर येत आहेत. शिवाय रामूच्या सरकारची हाताळणी चांगली असल्याने 'सरकार राज' मध्ये तो काय दाखवतोय ही उत्सुकता आहेच. यात अभिषेक बच्चनची भूमिका महत्त्वाची आहे, असे ऐकायला येते आहे.

' सरकार राज' राजकीय नाट्य आहे. नव्या आणि जुन्या पिढीतील संघर्ष यात आहे. नव्या आणि जुन्या दृष्टिकोनांमधील फरकही यात अधोरेखित केला आहे.

IFM
अनिता राजन (ऐश्वर्या राय बच्चन) शेपर्ड पॉवर प्लांट या आंतरराष्ट्रीय कंपनीची सीईओ आहे. तिला महाराष्ट्रातील ग्रामीण भागात एक वीज निर्मिती प्रकल्प उभा करायचा आहे. पारखी शंकर (अभिषेक बच्चन) या प्रकल्पाचे महत्त्व जाणून आहे. त्याच्यातून होणारे फायदेही त्याला कळतात. पण सरकार (अमिताभ बच्चन) यांचा त्याला विरोध आहे. त्याची अनेक कारणे आहेत. पण शेवटी शंकरची भूमिका त्यांना पटते.

IFM
मग अनिता शंकरबरोबर महाराष्ट्राच्या दौर्‍यावर निघते. या दौर्‍यातून लोकांचा पाठींबा मिळविणे हा त्यांचा हेतू आहे. दोघांचे उद्दिष्ट हा प्रकल्प उभारणे हे असते. पण हा मुद्दा अचानक राजकीय बनतो. सरकारविरोधी लोक एकत्र येतात आणि त्याला विरोध करतात. सरकारला संपविण्याची त्यांची योजना असते. पुढे काय होते, हे पडद्यावर पाहणेच औत्सुक्याचे ठरणार आहे.

रामगोपाल वर्माचा हा चित्रपट सरकारच्या एक पाऊल पुढे आहे, असे म्हटले जाते. विशेष म्हणजे अभिषेक व ऐश्वर्या यात असूनही त्यांच्यात प्रणयदृश्ये नाहीत. कारण हा पूर्ण चित्रपट गंभीर आहे.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले

नवाझुद्दीन सिद्दिकी आणि दिया मिर्झा यांची प्रमुख भूमिका असलेला 'डॉ. हसन' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

श्रद्धा कपूरच्या 'ईठा' ने प्रदर्शनापूर्वीच इतिहास रचला! चित्रपटाने 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये स्थान मिळवले; प्रमाणपत्र देऊन सन्मान

ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपट 'गोंधळ'; १०४ पात्र चित्रपटांच्या यादीत समावेश

Miss Universe: ११५ स्पर्धकांवर मात करीत जेनिफर बॅरेटोने मिस युनिव्हर्स २०२६ चा मुकुट जिंकला

मराठी चित्रपट "तू आहेस ना" IFFI 2026 मध्ये प्रदर्शित, सुप्रिया पिळगावकर आणि सिद्धार्थ बोडके यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली!

सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले ''मेळघाट अभयारण्य'' अमरावती Melghat Tiger Reserve

Kumar Sanu Guinness World Record कुमार सानू यांनी एका दिवसात २८ गाणी कशी रेकॉर्ड केली सांगितले

बंगाली अभिनेत्री मिमी चक्रवर्तीने गुपचूप लग्न केले, विवाहाचे सुंदर फोटो समोर आले

Maha Ganapati Temple Wai कृष्णा नदीच्या काठावर वसलेले जागृत 'ढोल्या गणपती मंदिर'

Show comments