Dharma Sangrah
✕

बेनेगलांचा 'वेलकम टू सज्जनपूर'

Updated: शुक्रवार, 12 सप्टेंबर 2008 (11:52 IST)
निर्माता - रॉनी स्क्रूवाला
पटकथा, दिग्दर्शक - श्याम बेनेगल
संगीत - शंतनू मोइत्रा
कलाकार - श्रेयस तळपदे, अमृता राव, रवी किशन, इला अरुण, दिव्या दत्ता, यशपाल शर्मा, राजेश्वरी सचदेव

सज्जनपुरात राहणारा महादेव समाजातील सुशिक्षित नागरिक आहे. कादंबरीकार बनण्याची त्याची इच्छा आहे. पोस्टाच्या बाहेर बसून तो अडाणी लोकांना पत्रे लिहून देण्याचे काम करतो. आपल्या या कामावर तो खूश आहे. आपल्या प्रतिभेचा वापर करून तो पत्रे लिहितो. त्याच्या या कामामुळे तो गावातही प्रसिद्ध आहे.

कमला ही सुंदर स्त्री त्याच्याकडे पत्र लिहून घेण्यासाठी येते. नोकरीसाठी मुंबईत गेलेल्या आपल्या पतीला तिला हे पत्र लिहायचे असते. कमलाला पाहून महादेवच्या मनात जुन्या आठवणी दाटून येतात. त्याला आठवते की, कमला नावाची मुलगी त्याच्याही वर्गात होती. ती त्याला आवडत असे. एक दिवस कमलाने त्याला सुंदर हस्ताक्षरात नोटस लिहण्यास सांगितले होते. या मोबदल्यात त्याने 'कीस' मागितला होता.

IFMIFM
या घटनेनंतर कमलाला तिच्या आई वडिलांनी शाळेतून काढून घेतले. पत्र लिहिण्यासाठी आलेल्या कमलाला पाहून महादेवच्या 'त्या' आठवणी ताज्या झाल्या. कमलाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्या पती-पत्नीचे नाते तुटावे असा खोटा मजकूर तो पत्रात लिहितो. त्याची खेळी यशस्वी होत असताना असे वळण येते की तो खलनायकाचा नायक बनतो. म्हणजे नेमके काय होते? ते चित्रपट पाहून समजून घेण्यात मजा आहे. 'वेलकम टू सज्जनपुर' ची पटकथा विनोद, मनोरंजन आणि संगीतमय अंगाने बांधण्यात आली आहे.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

कान्हेरी लेणी : मुंबईतील प्राचीन बौद्ध संस्कृतीचा अनमोल वारसा

दिलजीत दोसांझच्या बंगळूरु कॉन्सर्टला बॉम्बची धमकी मिळाली

धर्मेंद्र यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त हेमा मालिनी भावूक! म्हणाल्या, "त्यांच्याशिवाय आयुष्य खूप रिकामं वाटतं"

अमेरिकेत इतिहास रचल्यानंतर 'रामायण'ला मोठा धक्का, रणबीर कपूरचा चित्रपट ८०० चित्रपटगृहांमधून हटवला

मुलांना महाराष्ट्रातील १० ऐतिहासिक स्थळांवर घेऊन जा, काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल

Show comments