Biodata Maker marathi
✕

हॅरीच्या जादुई दुनियेची सफर

हॅरी पॉटर अँड द ऑर्डर ऑफ फिनिक्स आज प्रदर्शित होणार

Updated: गुरूवार, 12 जुलै 2007 (16:17 IST)
हॅरी पॉटरच्या हॉगवर्ड येथील शाळेतील हे पाचवे वर्ष. त्याचे मित्र रॉन आणि हरमोनी यांना भेटण्यासाठी हॅरी उत्सूक आहे. पण हे काय? हॉगवर्डची रयाच गेली आहे. हॉगवर्डची ख्याती परत मिळवून देण्यासाठी हॅरीला आता पुन्हा लढायचे आहे. त्याच्याबरोबर काही मोजके पण विश्वासू साथीदार आहेत. आणि आणखी एक महत्त्वाची बाब आहे, ती म्हणजे त्याचा आत्मविश्वास.

जगातील मुलांना ( आणि मोठ्यांनाही) वेड लावलेल्या आणि दंतकथा वाटावी अशी दिगंत कीर्ती मिळवलेल्या हॅरी पॉटरच्या आगामी हॅरी पॉटर अँड द ऑर्डर ऑफ फिनिक्स या चित्रपटाची ही संक्षिप्त कथा. डेव्हिड एटस आणि मायकल गोल्बनबर्ग यांनी संयुक्तरित्या दिग्दर्शित केलेला हा चित्रपट आहे. जे. के. रोलिंगच्याच कादंबरीवर हा चित्रपट आधारीत आहे. डॅनियल रॅडक्लिफ, हॅरी मेलिग व इम्मा वॉयसन यांच्यासह चो चॉंग यांच्या भूमिका आहेत.

जे. के. रोलिंगच्या लेखणीतून साकारलेल्या या हॅरी नावाच्या मानसपुत्राने जगभर धुमाकूळ घातला आहे. हे पुस्तक लिहित असताना रोलिंग कुणीच नव्हती. एका हॉटेलमध्ये जाऊन किरकोळ काही खायला मागवून ती हॅरीचे लेखन करायची. या लेखनातूनच हे पात्र साकारले आणि रोलिंगही कुठल्या कुठे पोहोचली. जगातील ती सर्वांत श्रीमंत स्त्री आहे. यातच सारे काही आले.

पण तिच्या कादंबरीतील हॅरी करतो तरी काय? हॅरी हा जादूचे शिक्षण देणार्‍या हॉगवार्टंस शाळेत शिकतो. (जादूचे शिक्षण देणारी शाळा. कल्पनाच किती रम्य आहे ना) बहुतेक कथानक येथेच घडते. येथे त्याला लॉर्ड व्होल्डेमॉर्टशी लढा द्यावा लागतो. या व्होल्डेमॉर्टनेच जादूई विश्वावर आपला कब्जा करण्यासाठी हॅरीच्या आई-वडिलांना मारलेले असते.

हॅरीच्या दुनियेचं वैशिष्ठ्य म्हणजे ती जितकी अद्भुतरम्य आहे तितकीच मानवी आहे. हे सगळे जादूगार आणि चेटकिणी सामान्यांसारखे वागतात. त्यांनाही आपल्यासारखेच प्रश्न असतात. जादूने त्यांचं आयुष्य कितीही वेगळं झालं असलं तरीही त्यांच्यासमोरची आव्हानंसुद्धा तितकीच अवघड आहेत (लॉर्ड व्होल्डेमॉर्ट).

सर्वसामान्य दुष्ट जादूगाराच्या प्रतिमेला विसंगत अशी यातली माणसं प्रेमळ (हॅग्रिड,मॉली वीझली), ऋषीतुल्य आदरणीय (अल्बस डम्बलडोर), आपल्या प्राणाचही बलिदान करण्यास मागेपुढे न पाहणारी (लिली पॉटर,जेम्स पॉटर,सीरिअस ब्लॅक) अशी सुद्धा आहेत. जादुई प्राणी-पक्षी, जादुई आणि खास हॅरीच्या राज्यातले चमत्कार यांची तिथे रेलचेल असते. शाळेच्या एरवी रोजच्याच आणि म्हणूनच नीरस वाटणाऱ्या पार्श्वभूमीवर जादूचा अभ्यास ही कल्पना अतिशय रम्य वाटते.

Pr
हॅरी पॉटर अँड दी फिलॉसॉफर्स स्टोन ही या पॉटरमालिकेतील पहिली कादंबरी १९९७ मध्ये प्रकाशित झाली अन तिने लहानग्यांच्या मनाचा कब्जा घेतला. जादूच्या करामती करणारा हॅरी लहानांना तर आवडलाच, पण मोठ्यांनाही त्याने भुरळ घातली. त्यानंतर मग 'हॅरी पॉटर मॅनिया' निर्माण व्हायला सुरवात झाली. कादंबर्‍यांचेही पुढचे भाग आले. त्यावर चित्रपटही निघाले. व्हिडीओ गेमही आले. हॅरीचे हे मार्केटिंग प्रचंड यशस्वी ठरले. यातून मिळणार्‍या पैशातून हॅरीची जन्मदात्री जे. के. रोलिंग प्रचंड श्रीमंत झाली.

आतापर्यंत हॅरीची सहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या पुस्तकांचा जगभरात सर्व प्रमुख म्हणजे ६३ भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. या सहा पुस्तकांच्या जगभरात३२५ दशलक्ष प्रती विकल्या गेल्या आहेत. आता या मालिकेतील सातवे पुस्तक येत्या तेवीस जुलैला प्रकाशित होणार आहे. हे पुस्तक शेवटचे असेल, असे रोलिंग यांनी जाहीर केले आहे.

त्यामुळे याविषयी मोठी उत्सूकता आहे. शिवाय यात हॅरीचा मृत्यू दाखविल्याची वदंता आहे. त्यामुळेसुद्धा या पुस्तकाविषयी प्रचंड उत्सूकता आहे. सहाव्या पुस्तकावेळी जगभरात पहिल्याच दिवशी त्याची मोठी विक्री झाली होती. भारतातही रात्री बारा वाजता दुकाने विक्रीसाठी उघडी ठेवली होती. त्यांनाही मोठा प्रतिसाद मिळाला होता. सातव्या पुस्तकासाठी एकट्या अमेरिकेतच बारा दशलक्ष प्रतींची नोंदणी झालेली आहे.

हॅरीवर आतापर्यंत चार चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यातील पाचवा शुक्रवारी (ता.१३) प्रदर्शित होणार आहे. याशिवाय सहावा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.

हॅरीचे चित्रपट
प्रदर्शित -
१. हॅरी पॉटर अँड द फिलासॉफर्स स्टोन (2001)
२. हॅरी पॉटर अँड द चैंबर्स ऑफ सीक्रेट्‍स (2002)
३.हॅरी पॉटर अँड प्रिजनर ऑफ अज़केबान (2004)
४.हॅरी पॉटर अँड द गोब्लेट ऑफ फायर (2005)

आगामी
१. हॅरी पॉटर अँड द ऑर्डर ऑफ फिनिक्स (2007)
२. हॅरी पॉटर अँड द हाफ ब्लड प्रिंसेस (2008)
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

साडी खरेदीला आलेला नवरा जेव्हा म्हणतो आदिमानव खरंच सुखी

Kebul Lamjao National Park मणिपूरमध्ये जगातील एकमेव तरंगणारे राष्ट्रीय उद्यान

Ye Prem Mol Liya Review: ४ वर्षांनंतर सूरज बडजात्या घेऊन येत आहेत नवा रोमँटिक ड्रामा; जाणून घ्या कोणते कलाकार झळकणार आणि काय असेल कथा?

'ईठा' आणि 'मातृभूमी' या चित्रपटांच्या प्रदर्शन तारखांमध्ये टक्कर; सलमान खानने माफी मागितली; म्हणाला....

सामंथा रुथ प्रभू आई झाली; अभिनेत्रीने गोंडस मुलाला जन्म दिला

Show comments