Biodata Maker marathi
✕

1920 : भयाचा 'भ्वॉक' अनुभव

Updated: शनिवार, 13 सप्टेंबर 2008 (12:18 IST)
निर्माता : सुरेंद्र शर्मा, भागवती गबरानी, अमिता बिश्नोई
दिग्दर्शक : विक्रम भट्ट
गीत : समीर
संगीत : अदनान सामी
कलाकार : रजनीश दुग्गल, अदा शर्मा, राज जुत्शी, विपीन शर्मा, वल्लभ व्यास, आशिष प्रधान
रेटिंग : 2.5/5
ए-सर्टिफिकेट * 16 रील

लोकवस्ती नसणार्‍या भकास भागात एक जुना वाडा... त्यामध्ये दोन व्यक्ती आणि एका नोकराचे वास्तव्य...
या वाड्यामध्ये वीज नसल्याने काळाकुट्ट अंधार... चारही बाजूस शुकशुकाट... वाड्यात घोंगावणार्‍या वार्‍यामुळे पडद्यांची
फडफड..... दारा-खिडक्यांची उघडझाप... पडद्यावरील हे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहताच हा 'हॉरर' चित्रपट असेल
अशी कल्पना आपणास नक्कीच आली असेल. हे चित्र आहे, विक्रम भट्ट यांच्या १९२० या चित्रपटातलं.

भट यांनी पटकथा शोधण्याची जादा तसदी घेतलेली दिसत नाही. जुन्या हॉरर चित्रपटांतूनच ही पटकथा उचलल्याचे जाणवते. अर्जुन (रजनीश दु्ग्गल) आणि लीसा (अदा शर्मा) हे दोघे आपल्या कुटुंबाच्या मर्जीविरुद्ध लग्न करतात. एक जुना वाडा पाडून त्या ठिकाणी हॉटेल बांधण्याचे अर्जुनला काम मिळते. ते दोघे या वाड्यात जाऊन राहतात. पण, त्याठिकाणी त्यांना चित्रविचित्र घटनांना सामोरे जावे लागते. लीसाच्या शरीरात एक आत्मा शिरतो आणि तिच्यात स्वभावात विचित्र बदल होत जातात. डॉक्टर, धर्मगुरुही हतबल होतात. तेव्हा ते हनुमान चालिसेचा आधार घेतात.

IFMIFM
या कथेमध्ये पुनर्जन्मही दाखविण्यात आला आहे. आत्म्याने लीसाच्या शरीरात का प्रवेश केला आहे? त्याला काय साधायचे
आहे? हे गूढ जाणून घेण्यासाठी हा चित्रपट 1920 मधून 1857 मध्ये पोहोचतो.
चित्रपटाची पटकथा किचकट आहे पण, विक्रम यांनी सोप्या पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. कथा भारतातील आहे, असे दाखविले असले तरी सर्व शूटिंग मात्र इंग्लंडमध्ये यार्कशायर प्रांतात झाले आहे. प्रेक्षकांच्या मनात भीती घालण्याचा दिग्दर्शक विक्रम भट्ट यांचा उद्देश आहे आणि यात ते यशस्वी झाले आहेत. मध्यंतरापूर्वी चित्रपट संथ वाटतो. घटना घडायला आणि ती समजायला फार वेळ लागतो. पण, मध्यंतरानंतर गती येते. लीसाच्या शरीरात आत्मा प्रवेश करतानाचे दृश्य अंगावर भीतीने थरकाप उडविते.

हा चित्रपट बघताना सहजच ‘भुलभुलैया’, ‘राज’ या रहस्यपटांची आठवण होते. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘फूंक’ या
चित्रपटाशीही याचे काहीसे साम्य वाटते. यातील नायकाचा देवावर अजिबात विश्वास नाही. पण, सगळीकडून संकटे आल्यावर हतबल होऊन तो देवाला शरण जातो, असे दाखविण्यात आले आहे. फूंकशी हे साधर्म्य आहे.

विक्रमने 1920 च्या काळात जाण्यासाठी काही जुन्या साधनांचा वापर केल्याचे दाखविण्यात आले आहे. चित्रपटातील इतर पात्रे आणि साधने पाहता जुन्या काळाचा आभास निर्माण होतो पण, नायक आणि नायिकांचा अभिनय आणि संवाद अलीकडच्या काळातील वाटतात. नायकच्या भूमिकेत रजनीश दुग्गलच्या चेहर्‍यावर अपेक्षित भाव दिसून येत नाहीत.
रजनीशच्या तुलनेत अदा शर्माला जास्त संधी मिळाली आहे. तसा तिने चांगला अभिनयही केला आहे. अंजूरी अलघने छोटी भूमिका सुंदर रंगवली. धर्मगुरुंच्या भूमिकेत राज जुत्शीचा प्रयत्न चांगला आहे. राखी सावंतवर चित्रित झालेले ‘बिछुआ’ हे
गाणे ठीक वाटते.

IFMIFM
हॉरर चित्रपटात संगीताची शक्यताही नसते. गाण्यांचा समावेश केला तर ती गाणी हिट व्हायला पाहिजेत, असा
अलिखित नियम आहे. अदनान सामीचे संगीत नेमक्या या अपेक्षांची पूर्ती करते. प्रवीण भटची फोटोग्राफी चांगली आहे. वाड्यातून भय व्यक्त करण्याबरोबरच इतर नैसर्गिक सौंदर्य त्याने उत्तमरीत्या टिपले आहे.
एकूणच ‘1920’ च्या पटकथेत नाविन्य नाही. पण 'भीती उत्पन्न करून घाबरण्याची' इच्छा असणार्‍यांना हा चित्रपट आवडू शकेल.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले

नवाझुद्दीन सिद्दिकी आणि दिया मिर्झा यांची प्रमुख भूमिका असलेला 'डॉ. हसन' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

श्रद्धा कपूरच्या 'ईठा' ने प्रदर्शनापूर्वीच इतिहास रचला! चित्रपटाने 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये स्थान मिळवले; प्रमाणपत्र देऊन सन्मान

ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपट 'गोंधळ'; १०४ पात्र चित्रपटांच्या यादीत समावेश

Miss Universe: ११५ स्पर्धकांवर मात करीत जेनिफर बॅरेटोने मिस युनिव्हर्स २०२६ चा मुकुट जिंकला

मराठी चित्रपट "तू आहेस ना" IFFI 2026 मध्ये प्रदर्शित, सुप्रिया पिळगावकर आणि सिद्धार्थ बोडके यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली!

सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले ''मेळघाट अभयारण्य'' अमरावती Melghat Tiger Reserve

Kumar Sanu Guinness World Record कुमार सानू यांनी एका दिवसात २८ गाणी कशी रेकॉर्ड केली सांगितले

बंगाली अभिनेत्री मिमी चक्रवर्तीने गुपचूप लग्न केले, विवाहाचे सुंदर फोटो समोर आले

Maha Ganapati Temple Wai कृष्णा नदीच्या काठावर वसलेले जागृत 'ढोल्या गणपती मंदिर'

Show comments