Biodata Maker marathi
✕

क्विक गन मुरूगन- फसलेले विडंबन

Updated: शुक्रवार, 28 ऑगस्ट 2009 (19:11 IST)
बॅन र : ए फै ट फि श मोश न पिक्चर् स, फॉक् स स्टा र स्टुडिय ो
दिग्दर्श क : शशां क घो ष
कलाका र : राजेद् र प्रसा द, विन य पाठ क, रणवी र शौर ी, संध्य ा मृदु ल, रम्भ ा, अश्वि न मुश्रा न

क्विग गन मुरूगनचे प्रोमोज पाहिले असतील दाक्षिणात्य काऊबॉयचा हा अवतार पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच उत्सुक असाल. पण ही उत्सुकता समाधानात उतरविण्याचे सामर्थ्य मात्र या चित्रपटात नाही. छानपैकी उपहासात्मक प्रसंगाची तडतडबाजी पहाण्यासाठी तुम्हा जाता आणि फुसका फटाका मात्र नशिबी येतो. उत्तम कच्च्या मालातून चांगली भाजी शिजवण्याच्या नादात ती करपून गेली आहे.

शशांक घोष दिग्दर्शित 'क्विग गन मुरूगनमधील' मुरूगन हे पात्र त्यांनी आणि राजेश देवराज यांनी १९९४ मध्ये चॅनेल व्हीसाठी जन्माला घातले होते. आता तोच मुरूगन (राजेंद्र प्रसाद) पडद्यावर आला आहे. हा एक तमिळ काऊबॉय आहे. तो पक्का शाकाहारी आहे आणि राईसप्लेट रेड्डी हा त्याचा शत्रू आहे. हा राईस प्लेट रेड्डी मॅकडोसा कॉर्पोरेशनचा प्रमुख आहे आणि नॉन व्हेज डोसा बनविण्याची त्याची योजना आहे. पण मॅंगो डॉली (रंभा) या आपल्या मदतनीसाच्या सहाय्याने मुरूगन त्याची ही योजना उधळून लावतो. मधल्या काळात प्रेयसी लॉकेट लव्हर (अनू मेनन) आणि त्याची मदतनीस मॅंगो डॉली यांच्यात त्याचे भजे होते. हाही कथाभाग आहे.

हा चित्रपट म्हणजे भारतीय चित्रपटाच्या टिपीकल साच्यावर केलेले हे विडंबन आहे. मात्र ९० मिनिटे हे विडंबन खेचून नेताना पटकथाकार आणि दिग्दर्शकाची चांगलीच गोची झाली आहे. या पात्रातून टिव्हीसाठी थोडावेळ विनोद निर्माण करणे सहज शक्य आहे. पण एक आख्खा चित्रपट त्याला घेऊन तयार करणे अवघड. कारण त्यासाठी बांधीव पटकथा लागते. विडंबनाचा प्लॉट शेवटपर्यंत पटकथेत न्यावा लागतो. मुरूगन इथेच कमी पडला आहे. या पात्राला एका कथेत बांधण्याचा अट्टाहास पूर्णतः अयशस्वी ठरला आहे.

अभिनयाच्या बाबतीत मुरूगन झालेल्या राजेंद्र प्रसादने बहार आणली आहे. 'माईंड इट'चा पंच अप्रतिम. अनू मेनन आणि रंभाही कामे त्यांच्या भूमिकेला साजेशी. रावडी एमबीए झालेल्या राजू सुंदरमचे काम लक्षणीय आहे.

एकुणात, क्विक गन मुरूगन विडंबनातून विनोद या अपेक्षेची पूर्ती करत नाही. पटकथा बांधिव आणि चुरचुरीत संवाद असते तर मजा आली असती.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले

नवाझुद्दीन सिद्दिकी आणि दिया मिर्झा यांची प्रमुख भूमिका असलेला 'डॉ. हसन' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

श्रद्धा कपूरच्या 'ईठा' ने प्रदर्शनापूर्वीच इतिहास रचला! चित्रपटाने 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये स्थान मिळवले; प्रमाणपत्र देऊन सन्मान

ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपट 'गोंधळ'; १०४ पात्र चित्रपटांच्या यादीत समावेश

Miss Universe: ११५ स्पर्धकांवर मात करीत जेनिफर बॅरेटोने मिस युनिव्हर्स २०२६ चा मुकुट जिंकला

सर्व पहा

IFFI 2026 ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तर 'हनुमान अंश'साठी विशाल चतुर्वेदीला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार

मराठी चित्रपट "तू आहेस ना" IFFI 2026 मध्ये प्रदर्शित, सुप्रिया पिळगावकर आणि सिद्धार्थ बोडके यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली!

सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले ''मेळघाट अभयारण्य'' अमरावती Melghat Tiger Reserve

Kumar Sanu Guinness World Record कुमार सानू यांनी एका दिवसात २८ गाणी कशी रेकॉर्ड केली सांगितले

बंगाली अभिनेत्री मिमी चक्रवर्तीने गुपचूप लग्न केले, विवाहाचे सुंदर फोटो समोर आले

Show comments