suvichar
✕

बचना ऐ हसीनो- जरा सांभाळूनच !

Updated: शनिवार, 16 ऑगस्ट 2008 (11:53 IST)
IFMIFM
या चित्रपटाचे शीर्षक गीत उधार घेतले आहे, तशीच त्याची कथाही काहीशी उधारच घेतलेली आहे. वेगवेगळ्या चित्रपटांवरून. पहिली कथा बेतलीय ती यशराज फिल्म्सच्याच 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' वर. ही कथा घडते १९९६ मध्ये. 'दिलवाले'प्रमाणेच यातही राज माहीबरोबर स्वित्झर्लंडमध्ये फिरत असतो. माहीची ट्रेन हुकते आणि राज तिला सोडण्याच्या निमित्ताने तिच्याबरोबर फिरतो. माहीला राजचे आकर्षण वाटते. पण राजला तिच्या एका चुंबनाव्यतिरिक्त काहीही मिळत नाही. पण मित्रांसमोर फुशारक्या मारताना राज काय वाट्टेल ते बो लत ो. ते ऐकून माहीला धक्का बसतो. माहीने आपल्या बोलणे ऐकल्याचे कळल्यानंतरही राज काहीही प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. पहिली कथा इथे संपते.

मग उजाडतं वर्ष २००२. मुंबईत राधिका (बिपाशा बसू) ही राजची गर्लफ्रेंड आहे. दोघांत 'लिव्ह इन' रिलेशनशिप आहे. म्हणजे राधिका राज बरोबर रहात असतो. लग्नाविना. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने ही कथा उचललीय आपल्याच 'सलाम नमस्ते'वरून. राधिका आणि राज यांच्यात लग्न बिग्न काहीही भानगड नाही. त्यामुळे खाणे-पिणे व ऐश करणे हा रोजचा नेम आहे. त्यातच राजला ऑस्ट्रेलियात नोकरी मिळते. तो राधिकाला हे सांगतो, तेव्हा ती त्याला आपल्याशी लग्न करण्याची गळ घालते. राजला ते नको असते. तिला नकार देता देता तो यात अडकून जातो. पण एके दिवशी तिला न सांगताच गुपचूप ऑस्ट्रेलियाला निघून जातो.

तिसरी कथा सुरू होते २००७ मध्ये ऑस्ट्रेलियात. सिडनीत राज त्याचा मित्र सचिनबरोबर रहात असतो. दोघेही पक्के उडाणटप्पू आणि आयुष्य हे उपभोगण्यासाठीच असते, हे तत्व मानणारे आहेत. 'हे बेबी' मधील पात्र कशी ऐश करतात, जगण्याचा तोच फॉर्म्युला यांचाही आहे. इथे राजची गाठ पडते, गायत्रीशी(दिपिका पदुकोण). गायत्री रात्री टॅक्सी चालवते व दिवसा अभ्यास करते. गायत्री राजला आवडते. तो तिच्यावर प्रेम करतो. तो लग्नसाठी तिला प्रपोजही करतो. पण गायत्री त्याला नकार देते. राजच्या ह्रदयाला मोठी ठेच बसते. या वेदनेची जाणीव त्याला पहिल्यांदा होते. त्याचवेळी आपण राधिका व माहीला किती दुःख दिले, याची जाणीवही त्याला होते. त्यानंतर मग तो या दोघींची माफी मागण्यासाठी भारतात येतो. यात तो किती यशस्वी ठरतो, हाच चित्रपटाचा उत्तरार्ध आहे.

IFMIFM
चित्रपटाची कथा छान आहे. त्यातून एक चांगला चित्रपट नक्कीच बनला असता. पण दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद व लेखक यांच्या मर्यादा चित्रपटावरही आल्या आहेत. तीन तीन मुली फिरवणार्‍या राजला अचानक आपल्या कृत्याची जाणीव होऊन तो पश्चात्तापापर्यंत येऊन पोहोचतो आणि पापक्षालनासाठी तो भारतात परततो, हे काही पटत नाही. किमान ह्रदयपरिवर्तनासाठी काही तरी मोठी घटना दाखवायला हवी होती. हे सारे इतके सहज घडल्याचे दाखविले आहे, की 'बात कुछ हजम नहीं होती.'

गायत्रीची भूमिकाही वरवरची आहे. आत्मसन्मान तिच्यासाठी महत्त्वाचा आहे. म्हणूनच तीन मुलींशी लफडी करणार्‍या मुलावर तिचे कसे काय प्रेम बसते काही कळत नाही. राजवर तिचे प्रेम नसेल तर मग ती त्याच्याबरोबर इटली फिरायला कशी काय जाते? ऑस्ट्रेलियातून इटली म्हणजे पुण्यातून सिंहगडावर फिरायला जाण्यासारखे आहे काय? यात काही मानसिक गुंतवणूक येत नाही काय? राजचा लग्नाचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर तिचे स्वतःचे ह्रदय परिवर्तन होऊन ती त्याच्याशी लग्नाला कशी काय तयार होते? आपल्याला त्याच्याबद्दल काय वाटते, हे ती भारतात गेलेल्या राजला रोज पत्र पाठवून कळवत असते. तिला हल्ली मोबाईल फोन, एसएमएस वा ई- मेल चा शोध लागलाय हे माहिती नसते का?

राज आणि माही यांची कथाही अतिशय कंटाळवाणी आहे. दुर्देवाने याच कथेला सर्वाधिक फुटेज आहे. ते पहाताना आपण एखादा जुना चित्रपट पहातोय असे वाटते. राज व माही यांच्यातील माफीनाम्याचे दृश्यही लांबलचक आहे. पंजाबी नाचगाण्याचा आता तर वीट आलाय.

राज व राधिका यांच्यातील कथा तेवढी जमलीय. पण राजला माफ करण्याच्या बदल्यात त्याला पीए बनविणे, वेटर बनविणे, रस्त्यावर नाचायला लावणे हे काही पटत नाही. ही कथा आणखी चांगली करता आली असती.

एकुणात बघायला गेले तर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने मध्यंतरापूर्वीचा चित्रपट बरा बनवला आहे. पण त्यानंतर मात्र ज्या अपेक्षा वाढतात, त्याला त्या पूर्ण होत नाही. अतिशय नीरसपणा जाणवतो.

IFMIFM
अभिनयासाठी रणबीर कपूरला चांगला वाव होता. कारण १८ ते ३० वर्षांपर्यंतच्या तरूणाचा प्रवास त्याला दाखवायचा होता. पण दुर्देवाने वयानुरूप त्याच्या अभिनयात फरक पडायला हवा होता, तो दिसत नाही. भावनात्मक प्रसंगातही त्याला चांगला अभिनय करता आला नाही. मिनिषा लांबाला का घेतले तेच कळले नाही. ती धड चांगली दिसतही नाही आणि अभिनयाचीही बोंब आहे. बिपाशा बसूला सर्वांत चांगली भूमिका मिळाली आहे आणि तिने ती चांगली केलीसुद्धा. ग्लॅमरस आणि फटाकड्या पोरीची भूमिका तिने मस्त निभावली आहे. दीपिकात आत्मविश्वास दिसला, पण त्याच्या भूमिकेचा विस्तारच नीट झालेला नाही. हितेन पेंटल व कुणार कपूर ठीक.

विशाल शेखरचे संगीत चांगले आहे. 'खुदा जाने', 'लकी बॉय', 'बचना ऐ हसीनो' व 'अहिस्ता अहिस्ता' ही गाणी तोंडी रुळू शकतील अशी आहेत. गाण्याचे चित्रीकरणही छान आहे.

एकुणात कथा पहाता 'बचना ऐ हसीनो' एक चांगला चित्रपट बनला असता, पण दिग्दर्शकाला कथा पेलली नाही. आणि एक साधारण चित्रपट तयार झाला. त्यामुळे एकदा पहायचा असल्यास ठीक. पण फार अपेक्षा ठेवू नका.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

कान्हेरी लेणी : मुंबईतील प्राचीन बौद्ध संस्कृतीचा अनमोल वारसा

दिलजीत दोसांझच्या बंगळूरु कॉन्सर्टला बॉम्बची धमकी मिळाली

धर्मेंद्र यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त हेमा मालिनी भावूक! म्हणाल्या, "त्यांच्याशिवाय आयुष्य खूप रिकामं वाटतं"

अमेरिकेत इतिहास रचल्यानंतर 'रामायण'ला मोठा धक्का, रणबीर कपूरचा चित्रपट ८०० चित्रपटगृहांमधून हटवला

मुलांना महाराष्ट्रातील १० ऐतिहासिक स्थळांवर घेऊन जा, काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल

Show comments